• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: चेन्नईच्या खेळपट्टीवर दिग्गज नाराज, बेन स्टोक्स म्हणाला...

IPL 2021: चेन्नईच्या खेळपट्टीवर दिग्गज नाराज, बेन स्टोक्स म्हणाला...

पंजाब किंग्जनं (PBKS) शुक्रवारी झालेल्या सामन्यात आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा (MI) 9 विकेट्सनं पराभव केला. या सामन्यानंतर दिग्गज क्रिकेटपटूंनी चेन्नईच्या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली आहे.

 • Share this:
  चेन्नई, 24 एप्रिल : पंजाब किंग्जनं (PBKS) शुक्रवारी झालेल्या सामन्यात आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा (MI) 9 विकेट्सनं पराभव केला. पंजाबच्या या विजयात केएल राहुल (KL Rahul) आणि ख्रिस गेल (Chris Gayle) यांची भूमिका निर्णायक ठरली. राहुलनं नाबाद 60 तर गेलनं नाबाद 43 रन काढले. चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर त्यांना 132 रनचा पाठलाग करताना 17.4 ओव्हर्स लागले. यापूर्वी मुंबई इंडियन्सला  निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 131 रन करता आले. मुंबईकडून कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) सर्वाधिक 63 रन काढले. तर सुर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) 33 रनची खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता मुंबईच्या अन्य बॅट्समन्सना रन काढता चांगलाच संघर्ष करावा लागला. या सामन्यानंतर दिग्गज क्रिकेटपटूंनी चेन्नईच्या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली आहे. आयपीएल स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर पडलेला राजस्थान रॉयल्सचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) या खेळपट्टीवर चांगलाच नाराज झाला आहे. त्यानं या खेळपट्टीला 'कचरा' असं म्हंटलं आहे. बेन स्टोक्सनं ट्विट करत त्याची नाराजी व्यक्त केली आहे. " मला आशा आहे की, या स्पर्धेच्या पुढील टप्प्यात खेळपट्टी आणखी खराब होणार नाही. कोणत्याही खेळपट्टीवर किमान 160 ते 170 रन झाले पाहिजेत. इथं 130 ते 140 रन देखील होत नाहीत. हे 'कचरा' खेळपट्टीमुळे होत आहे. ब्रेट ली देखील नाराज बेन स्टोक्स प्रमाणे ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ब्रेट ली (Brett Lee) देखील चेन्नईच्या खेळपट्टीवर नाराज आहे. त्यानंही ही खेळपट्टी पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर कोणत्याही बॅट्समनला या खेळपट्टीवर सूर गवसणं अवघड होतं, असं मत ब्रेट ली नं व्यक्त केलं आहे. ख्रिस मॉरीसची 16 कोटींची पात्रता नाही' दिग्गज क्रिकेटपटूनं सुनावलं पार्थिव पटेलनं (Parthiv Patel) देखील ब्रेट ली याच्या मताला सहमती दर्शवली. 'या खेळपट्टीवर बॅटींग करणे सोपे नव्हते. ख्रिस गेल आणि केएल राहुल यांनी त्यावर जबाबदारीनं बॅटींग केली. त्यांना योग्य श्रेय द्यायला हवे,' असं मत पार्थिवनं 'स्टार स्पोर्ट्स' वरील एका कार्यक्रमात व्यक्त केलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: