• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: आजपासून सुरू होतोय नवा हंगामा! एका क्लिकवर पाहा गेल्या 13 वर्षातील सर्वात मोठे रेकॉर्ड्स

IPL 2021: आजपासून सुरू होतोय नवा हंगामा! एका क्लिकवर पाहा गेल्या 13 वर्षातील सर्वात मोठे रेकॉर्ड्स

आयपीएलचा 14 वा सिझन (IPL 2021) सुरु होण्यापूर्वी मागच्या 13 सिझनमधील सर्व महत्त्वाचे रेकॉर्ड्स काय आहेत ते पाहूया

 • Share this:
  मुंबई, 9 एप्रिल: इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) स्पर्धेची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (MI vs RCB) या लढतीनं होणार आहे. चेन्नईतली एमए चिदंबरम स्टेडियमवर (Chepauk)  भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता मॅच सुरु होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे (Covid 19) यंदाची आयपीएल स्पर्धा फक्त सहा शहरांमध्ये होणार आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु आणि हैदराबाद या सहा शहरांमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत. या स्पर्धेची फायनल 30 मे रोजी होणार आहे. या स्पर्धेच्या दरम्यान कोणत्याही टीमला होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा बायो-बबलसह अनेक कडक निर्बंधामध्ये होणार आहे. आयपीएलचा 14 वा सिझन सुरु होण्यापूर्वी पाहूया मागच्या 13 सिझनमधील सर्व महत्त्वाचे रेकॉर्ड्स सर्वात जास्त वेळा आयपीएल टॉफी जिंकणारी टीम मुंबई इंडियन्स (5 वेळा) - 2013, 2015, 2017, 2019, 2020 चेन्नई सुपर किंग्स  (3 वेळा) - 2010, 2011, 2018 कोलकाता नाईट रायडर्स  (2 वेळा) - 2016 सर्वात जास्त रन्स विराट कोहली (RCB) - 5878 सुरेश रैना (CSK) - 5368 डेव्हिड वॉर्नर (SRH) - 5254 सर्वात जास्त शतक ख्रिस गेल (PBKS) - 6 विराट कोहली (RCB) - 5 डेव्हिड वॉर्नर (SRH) - 4 शेन वॉटसन (CSK) - 4 सर्वात जास्त सिक्स ख्रिस गेल (PBKS) - 349 एबी डीव्हिलियर्स (RCB) - 235 महेंद्रसिंह धोनी (CSK) - 216 सर्वात जास्त स्ट्राईक रेट आंद्रे रसेल (KKR) - 182.33 निकोलस पूरन - 165.39 सुनील नरीन - 164.27 ( IPL 2021: जोश हेजलवूडच्या जागी रोहितच्या जुन्या सहकाऱ्याची केली धोनीनं निवड ) सर्वात जास्त विकेट्स लसिथ मलिंगा (MI) - 170 अमित मिश्रा (DC) - 160 पियूष चावला (MI) - 156 सर्वोत्तम इकॉनॉमी रेट राशिद खान (SRH) - 6.24 अनिल कुंबळे (RCB) - 6.57 ग्लेन मॅग्रा (DD) - 6.61 सर्वोत्तम बॉलिंग सरासरी कागिसो रबाडा (DC) - 18.09 डग बोलिंजर (CSK) - 18.72 दिमित्री मास्करेंहास (KIXP) - 18.73 सर्वात जास्त डॉट बॉल हरभजन सिंग (KKR) - 1249 रविचंद्रन अश्विन (DC) - 1170 भुवनेश्वर कुमार (SRH) - 1164
  Published by:News18 Desk
  First published: