मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: वाढत्या कोरोना संक्रमणामुळे BCCI घाबरलं, स्पर्धेपूर्वी घेतला मोठा निर्णय

IPL 2021: वाढत्या कोरोना संक्रमणामुळे BCCI घाबरलं, स्पर्धेपूर्वी घेतला मोठा निर्णय

देशात कोरोना रुग्णांची (COVID-19) संख्या सातत्यानं वाढत आहे. या परिस्थितीमध्ये आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2021) आयोजनाबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 5 एप्रिल : देशात कोरोना रुग्णांची (COVID-19) संख्या सातत्यानं वाढत आहे. या परिस्थितीमध्ये आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2021) आयोजनाबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. आयपीएल स्पर्धेतील तीन खेळाडू तसंच काही सपोर्ट स्टाफला  कोरोना झाल्यानं या स्पर्धेला कोरोनापासून वाचवण्याचा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे. या सर्व परिस्थितीमध्ये बीसीसीआयनं (BCCI) मोठी घोषणा केली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाशी चर्चा करणार असल्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे. आयपीएल स्पर्धेची सुरुवात 9 एप्रिल रोजी होणार आहे.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत एएनआयला सांगितले की, 'कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. कोरोना कधी संपणार हे कुणालाही माहिती नाही. त्यामुळे खेळाडूंचे लसीकरण करणे आवश्यक आहे.' यापूर्वी आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचं लसीकरण करण्यात येणार नाही, अशी बातमी आली होती.

या विषयावर आरोग्य मंत्रालयाशी संपर्क करणार असल्याचंही राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील मालिकेच्या दरम्यान टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी कोरोना लस घेतली होती. मात्र अजून कोणत्याही खेळाडूनं लस घेतल्याची माहिती नाही.

( वाचा: IPL 2021: कोरोनाची भीती वाढली! दोन खेळाडूंनी नाकारली धोनीच्या टीमची ऑफर )

चार टीमला कोरोनाचा फटका

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमच्या देवदत्त पडिक्कलला कोरोनाची लागण झाली आहे. देवदत्त हा कोरोनाची लागण झालेला तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी केकेआरचा नितीश राणा आणि दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या कंटेट टीममधील एका सदस्यालाही कोरोना झाला आहे. त्याचबरोबर वानखेडे स्टेडियमधील 10 कर्मचारी आणि बीसीसीआयनं या स्पर्धेसाठी नियुक्त केलेल्या सहा सदस्यांचा रिपोर्ट देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

First published:

Tags: BCCI, Covid19, IPL 2021