मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: मुंबईत सामने होणार का? शरद पवारांकडून सूचक उत्तर

IPL 2021: मुंबईत सामने होणार का? शरद पवारांकडून सूचक उत्तर

महाराष्ट्रसह मुंबईमध्ये कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढली आहे. या वाढत्या संख्येमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सिझनमध्ये (IPL 2021) मुंबईमध्ये मॅच होणार की नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रसह मुंबईमध्ये कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढली आहे. या वाढत्या संख्येमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सिझनमध्ये (IPL 2021) मुंबईमध्ये मॅच होणार की नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रसह मुंबईमध्ये कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढली आहे. या वाढत्या संख्येमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सिझनमध्ये (IPL 2021) मुंबईमध्ये मॅच होणार की नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई, 6 मार्च : महाराष्ट्रसह मुंबईमध्ये कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढली आहे. या वाढत्या संख्येमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सिझनमध्ये (IPL 2021) मुंबईमध्ये मॅच होणार की नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या विषयावर आयपीएल संचालक ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) काही सदस्यांनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी आयपीएल सामन्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून सर्व प्रकारची मदत मिळेल असं आश्वासन शरद पवार यांनी या सर्वांना दिलं आहे. ‘क्रिकबझ’ नं हे वृत्त दिलं आहे.

आयपीएलचा 14 वा सिझन सुरु होण्यासाठी आता एक महिनाच उरला आहे. मात्र अद्याप या स्पर्धेचं वेळापत्रक बीसीसीआयनं जाहीर केलेलं नाही. कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरु दिल्ली आणि मुंबई ही सहा शहरं बीसीसीआयनं सध्या निश्चित केली आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारच्या परवानगीनंतरच मुंबईतील आयोजनाबाबत अंतिम निर्णय होईल, असं बीसीसीआयनं स्पष्ट केले आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं आयपीएल सामन्यांच्या आयोजनाबाबत अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. राज्यातील सत्तारुढ महाविकास आघाडी सरकारमधील शरद पवार हे प्रभावशाली नेते आहेत. त्यामुळे या विषयावर मार्ग काढण्यासाठी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पवारांकडे धाव घेतली होती.

मुंबईतील सामन्यांमध्ये प्रेक्षकांना परवानगी द्यायची की नाही? याबाबत या बैठकीत चर्चा झाली. ‘अहमदाबाद आणि चेन्नई प्रमाणेच मैदानात मुंबईतही 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये सामने खेळवण्यावर बैठकीत विचार करण्यात आला,’ अशी माहिती या बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यानं दिली आहे.

( वाचा : IND vs ENG :पाच बॉलमध्ये बदललं नशीब, वॉशिंग्टन सुंदर ठरला दुर्दैवी )

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक येत्या काही दिवसांमध्ये होणार असून या बैठकीनंतर स्पर्धेच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान जयपूर, मोहाली आणि हैदराबाद या तीन शहरांना आयपीएल आयोजनाच्य़ा यादीतून यंदा वगळण्यात आले आहे. त्यामुळे तेथील फ्रँचायझींनी बीसीसीआयकडं नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत या फ्रँचायझींनी बीसीसीआयला स्वतंत्र पत्र लिहिले आहे. त्यामुळे या समस्येवर बीसीसीआय कशी मात करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First published:

Tags: IPL 2021, Sharad pawar