IPL 2021 चा मेगा ऑक्शन होणार का नाही? BCCI ने टीमना दिली ही माहिती

IPL 2021 चा मेगा ऑक्शन होणार का नाही? BCCI ने टीमना दिली ही माहिती

आयपीएल (IPL 2020) चा हा मोसम संपल्यानंतर आता बीसीसीआय (BCCI) आणि क्रिकेट रसिकांना आयपीएलच्या पुढच्या हंगामाचे वेध लागले आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) चा हा मोसम संपल्यानंतर आता बीसीसीआय (BCCI) आणि क्रिकेट रसिकांना आयपीएलच्या पुढच्या हंगामाचे वेध लागले आहेत. पण त्याआधी बीसीसीआय खेळाडूंचा मेगा ऑक्शन करणार का नाही? याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. बीसीसीआय याचा निर्णय पुढच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये घेऊ शकते. मेगा ऑक्शन घ्यायचा का नाही, तसंच नवी टीम आणायची का नाही, याचा निर्णय डिसेंबर महिन्यात होईल, असं बीसीसीआयने सगळ्या 8 टीमना सांगितलं आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'वेळ कमी असला, तरी प्रत्येकाला मोठा लिलाव हवा आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल याबाबत तीन ते चार आठवड्यांमध्ये निर्णय घेईल.' तसंच नव्या टीमबाबत आता बोलणं लवकर होईल, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली.

कोणत्या टीमला होणार लिलावाचा सर्वाधिक फायदा?

आयपीएल 2020 साली जर मोठा लिलाव झाला, तर याचा सगळ्यात जास्त फायदा चेन्नईच्या टीमला होईल. चेन्नईला पुढच्या लिलावामध्ये भविष्याकडे बघून टीम उभारावी लागेल, असं त्यांचा कर्णधार एमएस धोनी म्हणाला होता. बीसीसीआयने मेगा ऑक्शनबाबत चर्चा केल्याचे संकेत चेन्नईने दिले आहेत.

फक्त चेन्नईच नाही तर राजस्थान, पंजाब, हैदराबाद आणि बँगलोर यांच्यासोबतही बीसीसीआयची लिलावाबाबत बोलणी झाल्याचं वृत्त आहे. पण काही टीम लिलावाच्या विरोधात आहेत. काही माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार दिल्ली आणि मुंबईच्या टीमचा लिलावाला विरोध आहे, त्यामुळे आता बीसीसीआय काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलं आहे.

Published by: Shreyas
First published: November 14, 2020, 6:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या