मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: उर्वरित मॅच कुठे होणार याचा सस्पेन्स कायम, ECB ने फेटाळली चर्चा

IPL 2021: उर्वरित मॅच कुठे होणार याचा सस्पेन्स कायम, ECB ने फेटाळली चर्चा

आयपीएल स्पर्धेतील उर्वरित मॅचसाठी भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये बदल करण्याची कोणतीही विनंती बीसीसीआयनं (BCCI) केली नाही, असं इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) स्पष्ट केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 21 मे: आयपीएल स्पर्धेतील उर्वरित मॅचसाठी भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये बदल करण्याची कोणतीही विनंती बीसीसीआयनं (BCCI) केली नाही, असं इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) स्पष्ट केलं आहे. कोरोना व्हारयसच्या उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित  करावी लागली होती.  या स्पर्धेतील उर्वरित 31 मॅचसाठी टेस्ट सीरिज एक आठवडा आधी संपवण्याची विनंती BCCI नं केली असल्याचं वृत्त प्रकाशित झाले होते.

'आमचा बीसीसीआयशी नियमित संपर्क आहे. भारत-इंग्लंड सीरिजच्या तारखा बदलण्याबाबच बीसीसीआयनं कोणतीही अधिकृत विनंती केलेली नाही. त्यामुळे आम्ही नियोजित वेळापत्रकानुसारच पाच टेस्टच्या सीरिजचं आयोजन करणार आहोत,' असे ईसीबीनं स्पष्ट केले आहे.

इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल आथरटन याने 'द टाईम्स' वृत्तपत्रामध्ये बीसीसीआयने केलेल्या विनंतीबाबत दावा केला होता. बीसीसीआयच्या सूत्रांनी हा दावा फेटाळला आहे. "आम्ही अनेक पर्यायांवर विचार करत आहोत. याबाबत कोणतीही अधिकृत विनंती करण्यात आलेली नाही,'' असे  त्यांनी स्पष्ट केले आहे.

या सिझनमधील 31 मॅच आणखी बाकी आहेत. उर्वरित मॅच झाल्या नाहीतर तर बीसीसीआयचे (BCCI) 2500 कोटींचे नुकसान होणार आहे. हा फटका टाळण्यासाठी बीसीसीआय आयपीएलच्या उर्वरित मॅच घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.  नियोजित वेळापत्रकानुसार भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टेस्ट  4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहेत. ओल्ड ट्रॅफर्ड मैदावावर 10 सप्टेंबर रोजी शेवटची टेस्ट सुरू होईल.

पदावरुन दूर झाल्यानंतर टीम इंडियाच्या माजी कोचची प्रतिक्रिया, म्हणाले..

इंग्लंड क्रिकेट बोर्ड 21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीमध्ये 'द हंड्रेड' या स्पर्धेचं आयोजन करणार आहे. भारत-इंग्लंड टेस्ट सीरिज लवकर संपवायची असेल तर बोर्डाला ब्रॉडकास्टरचे वेळापत्रक, हॉटेल, बायो-बबल आणि तिकीट विक्री या सर्वांची नव्याने तयारी करावी लागेल. बीसीसीआयसमोर आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाचे युएई आणि श्रीलंका हे दोन पर्याय आहेत.

First published:

Tags: BCCI, Cricket news, IPL 2021