Home /News /sport /

IPL 2021: यावर्षी पंजाब जिकणार स्पर्धा? BBL विजेता कॅप्टन सांगणार KL राहुलला विजयी मंत्र

IPL 2021: यावर्षी पंजाब जिकणार स्पर्धा? BBL विजेता कॅप्टन सांगणार KL राहुलला विजयी मंत्र

मोईसेस हेनरिक्सच्या (Moises Henriques) कॅप्टनसीमध्ये सिडनी सिक्सर्सनं बिग बॅश लीग (BBL) स्पर्धा जिंकली आहे. या आयपीएलमध्ये गरज पडली तर पंजाबचा कॅप्टन केएल राहुलला (KL Rahul) मदत करण्यास तयार असल्याचं त्यानं सांगितलं आहे.

    मुंबई, 8 एप्रिल: आयपीएल स्पर्धेत पहिल्या वर्षापासून खेळूनही विजेतेपद न पटकावलेल्या तीन टीममध्ये पंजाब किंग्सचा (Punjab Kings) समावेश होता. या टीमनं यावर्षी नाव बदललं आहे. आता नाव बदलल्यावर नशिब बदलण्यासाठी अनेक नव्या खेळाडूंना या टीमनं यंदा करारबद्ध केलं आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मोईसेस हेनरिक्स (Moises Henriques) याचाही समावेश आहे. हेनरिक्सच्या कॅप्टनसीमध्ये सिडनी सिक्सर्सनं बिग बॅश लीग (BBL) स्पर्धा जिंकली आहे. या आयपीएलमध्ये गरज पडली तर पंजाबचा कॅप्टन केएल राहुलला (KL Rahul) मदत करण्यास तयार असल्याचं त्यानं सांगितलं आहे. हेनरिक्सनं सांगितलं आहे की, "तुम्ही कॅप्टन आहात म्हणजे तुम्ही मॅच चालवू शकता असं नाही. माझ्याकडं 10 चांगले खेळाडू होते. तसंच चांगले लीडर्सही होते. ते माझी मदत करत मी आता राहुलसाठी देखील हे करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी मॅच खेळेल किंवा खेळणार नाही पण मी टीमला चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहे," असं त्यानं स्पष्ट केलं आहे. क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकारात फिल्डिंगला मोठं महत्त्व असल्याचं हेनरिक्सनं सांगितलं. "मी ज्या चांगल्या टीमकडून खेळलो आहे, त्यांची फिल्डिंग चांगली होती. समोरची टीम खराब फिल्डिंगमुळे अतिरिक्त रन देत असताना तुम्ही 5-10 रन वाचवले तसंच चांगले झेल घेतले तर एका सिझनमध्ये दोन-तीन अतिरिक्त विजय मिळवता येतात," असा दावा त्यानं केला. हेनरिक्सचं करियर मोईसेस हेनरिक्स हा टी20 प्रकारातील अनुभवी खेळाडू आहे. त्यानं 213 टी 20 सामन्यात 3991 रन काढले आहेत. त्याचबरोबर 111 विकेट्स घेतल्या आहेत. यावर्षी झालेल्या लिलावात (IPL 2021 Auction) त्याला पंजाबनं 4.2 कोटींना खरेदी केलं. तो अंतिम 11 मध्ये खेळण्याची दाट शक्यता आहे. (वाचा : उसेन बोल्टचा RCB ला खास संदेश! विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया ) हेनरिक्स यापूर्वी 2017 साली आयपीएलमध्ये खेळला होता. त्या सिझनमध्ये त्यानं तीन अर्धशतक लगावले होते. त्यानं आयपीएलच्या एकूण करियरमध्ये 57 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 978 रन काढले असून 38 विकेट्स घेतल्या आहेत. याच कामगिरीची पुनारावृत्ती करण्याचा त्याचा यंदा प्रयत्न असेल. पंजाब किंग्सची पहिली मॅच राजस्थान रॉयल्स (PBKS vs RR) विरुद्ध 12 एप्रिल रोजी मुंबईत होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, IPL 2021, Kl rahul, Punjab kings

    पुढील बातम्या