IPL 2021: कोरोनाला हरवून दिल्लीचा ऑल राउंडर परतला, पाहा VIDEO

IPL 2021: कोरोनाला हरवून दिल्लीचा ऑल राउंडर परतला, पाहा VIDEO

दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्लीचा ऑल राऊंडर अक्षर पटेल (Axar Patel) टीममध्ये परतला आहे. अक्षरला 3 एप्रिल रोजी कोरोनाची (Covid 19) लागण झाली होती.

  • Share this:

चेन्नई, 23 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्लीचा ऑल राऊंडर अक्षर पटेल (Axar Patel) टीममध्ये परतला आहे. अक्षरला 3 एप्रिल रोजी कोरोनाची (Covid 19) लागण झाली होती. त्यानंतर तीन आठवड्यांनी तो टीममध्ये परतला आहे.

दिल्ली कॅपिटल्सनं त्यांच्या ट्विटर हँडलवरुन अक्षर परतल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.  माणसं बघूनच मला आनंद होत आहे, अशी भावना अक्षरनं यावेळी व्यक्त केली. अक्षर सुरुवातीाला दिल्ली कॅपिटल्सच्या काही स्टाफला भेटला. त्यानंतर त्यानं इशांत शर्मासह (Ishant Sharma) काही खेळाडूंची भेट घेतली.

अक्षर हा कोरोना झालेला आयपीएलचा तिसरा खेळाडू होता. त्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा नितीश राणा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा देवदत्त पडिक्कल  हे दोघं कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आता हे दोन्ही खेळाडू त्यांच्या टीममध्ये परतले असून त्यांच्या टीमकडून खेळत आहेत. देवदत्तनं गुरुवारीच आयपीएल कारकिर्दीमधील पहिलं शतक झळकावलं आहे.

IPL 2021: सनरायझर्स हैदराबादला धक्का, प्रमुख खेळाडू स्पर्धेतून आऊट

भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी मालिकेत अक्षर जबरदस्त यशस्वी ठरला होता. त्यानं 3 टेस्टमध्ये 27 विकेट्स घेतल्या होत्या. या आयपीएलमध्येही अक्षरकडून त्याच प्रकारच्या दमदार कामगिरीची दिल्लीला अपेक्षा असेल. अक्षरच्या जागी हंगामी खेळाडू म्हणून दिल्ली कॅपिटल्सनं शम्स मुलानीची निवड केली होती. दिल्ली कॅपिटल्सची पुढील मॅच 25 तारखेला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. या आयपीएल सिझनमध्ये दिल्लीनं 4 पैकी 3 सामने जिंकले असून एका सामन्यात पराभव पत्कारला आहे. आता अक्षरच्यी समावेशानं दिल्लीची टीम आणखी मजबूत झाली आहे.

Published by: News18 Desk
First published: April 23, 2021, 2:39 PM IST

ताज्या बातम्या