IPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार, 'हे' आहे कारण

IPL स्पर्धा रद्द झाली तरी वॉर्नर, स्मिथ, कमिन्सला मिळणार पूर्ण पगार, 'हे' आहे कारण

आयपीएल 2021 (IPL 2021) मधील उर्वरित मॅच झाल्या नाहीत तरीही डेव्हिड वॉर्नर (David Warner), स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), पॅट कमिन्स (Pat Cummins) या सारख्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्यांची पूर्ण रक्कम मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे: आयपीएल 2021 (IPL 2021) मधील उर्वरित मॅच झाल्या नाहीत तरीही डेव्हिड वॉर्नर (David Warner), स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), पॅट कमिन्स (Pat Cummins) या सारख्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्यांची पूर्ण रक्कम मिळणार आहे. वेगवेगळ्या विमा योजनेच्या अंतर्गत सर्व फ्रँचायझींनी आपल्या जास्तीत जास्त खेळाडूंना कव्हर केलं आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा रद्द झाली तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना जवळपास 18 दशलक्ष डॉलर मिळतील अशी शक्यता आहे.

आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, कोच आणि सपोर्ट स्टाफ भारतामधून मालदीवमध्ये गेला आहे. ऑस्ट्रेलियन सरकार आणि क्रिकेट बोर्ड त्यांना सुखरुप मायदेशी आणण्याची योजना तयार करत आहेत. 15 मे पासून ऑस्ट्रेलियाची बॉर्डर विदेशातून येणाऱ्या विमानांना खुली होणार आहे. या खेळाडूंसाठी बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझी चार्टर्ड विमान उपलब्ध करुन देणार आहेत.

टी 20 वर्ल्ड कपच्या पूर्वी आयपीएलचे उर्वरित सामने होण्याची शक्यता आहे. हे सामने भारतामध्ये होणार नसल्याचं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी स्पष्ट केलंय. यूएई, इंग्लंड आणि श्रीलंका हे तीन पर्याय बीसीसीआयसमोर आहेत. हे सामने सप्टेंबरमध्ये घेण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.

या सामन्यांसाठी इंग्लंडचे खेळाडू उपलब्ध नसतील अशी घोषणा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं यापूर्वीच केली आहे. तर न्यूझीलंडचे खेळाडू देखील खेळण्याची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा सध्या तरी सप्टेंबरमध्ये वेळ रिकामा आहे. मात्र येत्या काळात त्यामध्ये बदल होऊ शकतो.

ICC Test Ranking: सलग पाचव्या वर्षी टीम इंडिया ऑन टॉप, न्यूझीलंडचा धोका वाढला!

फ्यूचर्स टूर्स प्रोग्रॅमनुसार (FTP) टी 20 वर्ल्ड कपच्या पूर्वी ऑस्ट्रेलिया श्रीलंका विरुद्ध मर्यादीत ओव्हर्सची सीरिज खेळणार आहे. ही सीरिज ऑस्ट्रेलियात होईल. त्यापूर्वी जून-जुलैमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम वेस्ट इंडिजचा दौरा करेल. आयपीएल खेळाडूंना मिळाणाऱ्या पगाराला विमा संरक्षण देण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाचे एंड्रयू टाय, एडम झम्पा, केन रिचर्डसन या खेळाडूंना या योजनेचा फायदा मिळणार नाही, कारण त्यांनी स्वत:च्या मर्जीनुसार आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती.

Published by: News18 Desk
First published: May 13, 2021, 3:08 PM IST

ताज्या बातम्या