मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: खेळाडूंना NOC देण्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलिया करणार ‘या’ गोष्टीचा विचार

IPL 2021: खेळाडूंना NOC देण्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलिया करणार ‘या’ गोष्टीचा विचार

आयपीएल (IPL) स्पर्धेत ऑस्ट्रेलियन खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.  सर्व खेळाडूंसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (CA) एक नवा नियम केला आहे.

आयपीएल (IPL) स्पर्धेत ऑस्ट्रेलियन खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. सर्व खेळाडूंसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (CA) एक नवा नियम केला आहे.

आयपीएल (IPL) स्पर्धेत ऑस्ट्रेलियन खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. सर्व खेळाडूंसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (CA) एक नवा नियम केला आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 03 फेब्रुवारी :  इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल (IPL) स्पर्धेच्या 14 व्या सिझनला एप्रिलमध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे. या सीझनची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. 18 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये खेळाडूंचा लिलाव (Player Auction) होणार आहे. या लिलावाकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. या सिझनसाठीच्या सर्व आयपीएल टीम त्याच दिवशी निश्चित होतील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा नियम आयपीएल स्पर्धेत ऑस्ट्रेलियन खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. मागील वर्षी UAE मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये 19 ऑस्ट्रेलियन खेळाडू सहभागी झाले होते. यंदा देखील एक डझनपेक्षा जास्त ऑस्ट्रेलियन या स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे. या सर्व खेळाडूंसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं एक नवा नियम केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या योग्यतेनुसार ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हंगामी संचालक निकी हॉल यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. ‘सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड’ या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राशी बोलताना हॉल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 'मागच्या वर्षी आयपीएल जैव सुरक्षित वातावरणात (Bio Bubble) पार पडले होते. यंदा आमच्याकडं खेळाडूंचे अर्ज आल्यानंतर त्याच्या योग्यतेनुसार आम्ही त्या अर्जावर विचार करु.' असं हॉल यांनी स्पष्ट केलं आहे. तर,  आयपीएल स्पर्धेचं आयोजन हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ब्रेकमध्येच केलं जातं. त्यामुळे एखाद्या खेळाडूला दुखापत असल्याशिवाय क्रिकेट ऑस्ट्रेलियाला हे प्रमाणपत्र देण्यास अडचण येणार नाही, असं मत ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या असोसिएशननं व्यक्त केलं आहे. दक्षिण आफ्रिका दौरा रद्द क्रिकेट ऑस्ट्रेलियानं नुकताच दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यात तीन टेस्ट मॅचची सीरिज सुरु होणार होती. दक्षिण आफ्रिकेतील कोरना (Covid19) परिस्थितीमुळे  आमच्यासमोर हा दौरा रद्द करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, असं ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’नं स्पष्ट केलं आहे.
First published:

Tags: Australia, Cricket, India vs Australia, IPL 2021

पुढील बातम्या