मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: महेंद्रसिंह धोनीची वाढणार शक्ती, धोकादायक खेळाडूचं टीममध्ये पुनरागमन

IPL 2021: महेंद्रसिंह धोनीची वाढणार शक्ती, धोकादायक खेळाडूचं टीममध्ये पुनरागमन

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील टेस्ट सीरिजची सध्या सर्वत्र चर्चा असली तरी आयपीएल टीमनं पुढील महिन्यात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याची (IPL 2021) तयारी सुरू केली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील टेस्ट सीरिजची सध्या सर्वत्र चर्चा असली तरी आयपीएल टीमनं पुढील महिन्यात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याची (IPL 2021) तयारी सुरू केली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील टेस्ट सीरिजची सध्या सर्वत्र चर्चा असली तरी आयपीएल टीमनं पुढील महिन्यात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याची (IPL 2021) तयारी सुरू केली आहे.

मुंबई, 19 ऑगस्ट: भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील टेस्ट सीरिजची सध्या सर्वत्र चर्चा असली तरी आयपीएल टीमनं पुढील महिन्यात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याची (IPL 2021) तयारी सुरू केली आहे. भारतामधील स्पर्धेच्या दरम्यान बायो-बबलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानं ही स्पर्धा 29 सामन्यानंतर स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आता उर्वरित 31 सामने यूएईमध्ये होणार आहेत.

या टप्प्याच्या तयारीसाठी दुबईमध्ये दाखल झालेल्या महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जोश हेजलवूड (Josh Hazlewood)  यूएईमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाछी उपलब्ध असेल. त्याने यापूर्वी पहिल्या टप्प्यात कौटुंबिक कारणांमुळे माघार घेतली होती.

'क्रिकबझ' नं दिलेल्या वृत्तानुसार हेजलवूड आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा खेळणार असून तो लवकरच यूएईमध्ये टीमसोबत दाखल होईल. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हेजववूडनं माघार घेतल्यानंतर सीएसकेनं जेसन बेहरनडॉर्फचा बदली खेळाडू म्हणून समावेश केला होता. बेहरनड्रॉफचा क्वारंटाईन कालावधी संपण्यापूर्वीच आयपीएलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे बेहरनड्रॉफला एकही सामना न खेळता ऑस्ट्रेलियात परत जावं लागलं होतं.

हेजलवूडनं माघार का घेतली होती?

हेजलवूडनं 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'च्या वेबसाईटशी बोलताना या स्पर्धेतील माघारीचं कारण दिलं आहे. 'बायो बबल आणि वेगवेगळ्या काळात क्वारंटाईन राहून 10 महिने उलटले आहेत. त्यामुळे मी सध्या क्रिकेटमधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. आम्हाला नंतरच्या कालावधीमध्येही बरंच क्रिकेट खेळायचं आहे,' असे त्याने स्पष्ट केले.

विराट आणि अनुष्कानं केलं लंडनच्या हॉटेलमध्ये लंच, फॅन्समध्ये रंगली Vamika बद्दल चर्चा

'आम्हाला वेस्ट इंडिजचा मोठा दौरा करायचा आहे. त्यानंतर बांगलादेश दौरा, टी 20 वर्ल्ड कप आणि नंतर अ‍ॅशेस यामुळे पुढील 12 महिने अतिशय व्यस्त असतील.  या काळात मला स्वत:ला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या फिट राहयचं आहे. त्यामुळे मी आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे,' असे हेजलवूडने सांगितले होते.

First published:

Tags: Cricket news, Csk, IPL 2021