मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction 2021: आजवर अबाधित असलेला युवराज सिंगचा विक्रम यंदा तुटणार का?

IPL Auction 2021: आजवर अबाधित असलेला युवराज सिंगचा विक्रम यंदा तुटणार का?

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि स्टार ऑल राऊंडर युवराज सिंह (Yuvraj Singh) हा आयपीएल लिलावातील आजवरचा सर्वात महागडा खेळाडू आहे. सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 च्या लिलावात युवराज सिंहनं इतिहास रचला होता.

चेन्नई, 18 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपून ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती तो दिवस अखेर आला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सीझनसाठी (IPL 2021) खेळाडूंचा लिलाव काही तासांमध्ये सुरु होणार आहे. या लिलावाची उत्सुकता आता शिगेला पोहचली असून त्यासंबंधीचे सर्व अपडेट्स तुम्हाला https://lokmat.news18.com/ या साईटवर (News 18 lokmat Live IPL auction Updates ) वाचता येतील.

युवराजचा विक्रम तुटणार का?

यंदाच्या लिलावापूर्वी आठ टीममधील 61 जागा रिक्त आहेत. त्यासाठी 292 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. इंग्लंडचा फास्ट बॉलर मार्क वुड (Mark Wood) यानं काही तासांपूर्वीच स्वत:च नाव लिलावातून मागं घेतलं आहे. यावर्षीच्या लिलावात कोणता खेळाडू सर्वात जास्त महागडा ठरणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.

(हे वाचा : IPL Auction 2021: लिलावादरम्यान ‘या’ नियमांची घ्यावी लागणार सर्व फ्रँचायझींना काळजी )

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि स्टार ऑल राऊंडर युवराज सिंग (Yuvraj Singh) हा आयपीएल लिलावातील आजवरचा सर्वात महागडा खेळाडू आहे. सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 च्या लिलावात युवराज सिंहनं इतिहास रचला होता. युवराजला दिल्ली डेयरडेव्हिल्सनं तब्बल 16 कोटी रुपये देऊन खरेदी केलं होतं. विक्रमी किंमत देऊन खरेदी केलेल्या युवराजला त्या सीझनमध्ये फार कमाल करता आली नाही. त्यानं त्या सिझनमधील 14 मॅचमध्ये 19 च्या सरासरीनं फक्त 248 रन काढले होते. त्यामुळे युवराजला पुढील सीझनपूर्वी रिलीज करण्यात आले होते.

सर्वात महागडा विदेशी खेळाडू कोण?

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) हा आयपीएलच्या इतिहासातील आजवरचा सर्वात महागडा विदेशी खेळाडू आहे. मागील वर्षी झालेल्या लिलावात कमिन्सनं बेन स्टोक्सला मागं टाकलं होतं. कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) कमिन्सला 15.5 कोटींना खरेदी केलं होतं. KKR नं कमिन्सला यावर्षी देखील रिटेन केले आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, IPL 2021, Ipl 2021 auction, Yuvraj singh