Home /News /sport /

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सचे दोन मोठे निर्णय, श्रेयस अय्यरच्या जागी 'या' खेळाडूचा समावेश

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सचे दोन मोठे निर्णय, श्रेयस अय्यरच्या जागी 'या' खेळाडूचा समावेश

दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) आयपीएलमधील दुसरी मॅच राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध सुरु झाली आहे. या मॅचपूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटनं दोन मोठे निर्णय घेतले आहेत.

    मुंबई, 15 एप्रिल: दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) आयपीएलमधील दुसरी मॅच राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध सुरु झाली आहे. या मॅचपूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटनं दोन मोठे निर्णय घेतले आहेत. दिल्ली कॅपिटल्सनं तयांचा नियमित कॅप्टन श्रेयस अय्यरच्या (Shreys Iyer) जागी बदली खेळाडूचीा घोषणा केली आहे. त्याचबरोबर कोरोना व्हायरसची लागण झालेला ऑल राऊंडर अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी तात्पुरत्या बदली खेळाडूचा समावेश दिल्लीनं केला आहे. दिल्ली कॅपिटल्सनं श्रेयस अय्यरच्या जागी अनिरुद्ध जोशीचा (Aniruddha Joshi) समावेश केला आहे. अनिरुद्धची ही तिसरी आयपीएल टीम आहे. तो यापूर्वी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन टीमचा सदस्य होता. मात्र त्याला आयपीएल टीमच्या अंतिम 11 मध्ये संधी मिळालेली नाही. अक्षर पटेलच्या जागी मुंबईचा ऑल राऊंडर शम्स मुलानीचा (Shams Mulani) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेल कोरोनातून बरा होईपर्यंत मुलानी दिल्लीच्या टीमचा भाग असेल. त्याला आयपीएलमध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. दिल्ली कॅपिटल्सची दुसरी मॅच राजस्थान रॉयल्सशी होत आहे.विशेष म्हणजे या हंगामात पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणारे विकेटकिपर-बॅट्समन ऋषभ पंत (दिल्ली) आणि संजू सॅमसन (राजस्थान) या मॅचमध्ये आमने-सामने आहेत. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसननं टॉस जिंकला असून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सनं पूर्ण केली पृथ्वी शॉची 'ती' मागणी, Video Viral राजस्थानचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून आऊट झाला आहे. त्याच्या जागी डेव्हिड मिलरला(David Miller) संधी मिळाली आहे. तर श्रेयस गोपाळच्या जागी जयदेव उनाडकतचा समावेश करण्यात आला आहे. तर दिल्लीच्या टीममध्ये दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर अमित मिश्राच्या जागी ललित यादवला (Lalit Yadav) संधी मिळाली आहे . ललितची ही पहिलीच आयपीएल मॅत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Axar patel, Delhi capitals, IPL 2021, Shreyas iyer

    पुढील बातम्या