IPL 2021: CSK च्या 'या' बॅट्समननं केली रोहित शर्माची बरोबरी

IPL 2021: CSK च्या 'या' बॅट्समननं केली रोहित शर्माची बरोबरी

यपीएल स्पर्धेतील (IPL 2021) आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) पंजाब किंग्जचा (PBKS) सहा विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये सीएसकेचा बॅट्समन अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याच्या नावावर एक नकोसा रेकॉर्ड नोंद झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) पंजाब किंग्जचा (PBKS) सहा विकेट्सनं पराभव केला. दीपक चहरच्या (Deepak Chahar) वेगवान माऱ्यापुढे पंजाबची टीम 8 आऊट 106 पर्यंतच मजल मारु शकली. चहरनं फक्त 13 रन देत 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर सीएकेनं हे आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या मॅचमध्ये सीएसकेचा बॅट्समन अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याच्या नावावर एक नकोसा रेकॉर्ड नोंद झाला आहे.

चेन्नईचा स्कोअर 3 आऊट 99 होता त्यावेळी रायुडू मैदानात आला. मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) पहिल्या बॉलवर फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि तो शून्यावर आऊट झाला. रायुडू शून्यावर आऊट होताच त्याच्या नावावर या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

आयपीएल इतिहासात सर्वात जास्त वेळा शून्यावर आऊट होण्याच्या रेकॉर्डची रायुडूनं बरोबरी केली आहे. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), हरभजन सिंग (Harbhjan Singh) आणि पार्थिव पटेल (Parthiv Patel) यांच्या यादीत आता रायुडू देखील दाखल झाला आहे. हे सर्व जण आयपीएल इतिहासात एकूण 13 वेळा शून्यावर आऊट झाले आहेत.

रायुडूची कारकिर्द

अंबती रायडू हा आयपीएलमधील एक अनुभवी बॅट्सनमन आहे. तो 2010 पासून आयपीएलमध्ये खेळत असून आजवर त्यानं मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन आयपीएल टीमचं प्रतिनिधित्व केलं आहे. रायुडूनं आयपीएल स्पर्धेत 161 मॅचमध्ये 29.22 च्या सरासरीनं 3682 रन काढले आहेत. त्याचा या स्पर्धेतील स्ट्राईक रेट 126.13 आहे. रायुडूनं आयपीएलमध्ये 1 शतक आणि 19 अर्धशतक झळकावली आहेत.

(वाचा : 'वानखेडे'वर धोनीने पुन्हा घडवला इतिहास, हा विक्रम करणारा पहिलाच )

रायुडूनं टीम इंडियाकडून 55 वन-डे मध्ये 47.05 च्या सरासरीनं 1694 रन काढले आहेत. यामध्ये 3 शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याच्या जागी विजय शंकरची निवड करण्याचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला होता. रायुडूनं या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

Published by: News18 Desk
First published: April 17, 2021, 9:47 AM IST

ताज्या बातम्या