Home /News /sport /

KKR vs CSK, Dream 11 Team Prediction: 'हे' 11 जण बदलतील तुमचं नशीब

KKR vs CSK, Dream 11 Team Prediction: 'हे' 11 जण बदलतील तुमचं नशीब

आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2021) सेकंड हाफमध्ये रविवारी दोन मॅच होणार आहेत. यामधील पहिली मॅच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात होणार आहे.

    मुंबई, 26 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2021) सेकंड हाफमध्ये रविवारी दोन मॅच होणार आहेत. यामधील पहिली मॅच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात होणार आहे. आयपीएल स्पर्धेतील ही 38 वी मॅच आहे. चेन्नईनं या स्पर्धेत  9 पैकी 7 मॅच जिंकल्या असून 14 पॉईंट्ससह ती टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सनं 9 पैकी 4 सामने जिंकले असून ही टीम सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. चेन्नईचा 'प्ले ऑफ' मधील प्रवेश जवळपास निश्चित आहे. तर हा सामना जिंकून 'प्ले ऑफ'ची दावेदारी मजबूत करण्याचा केकेआरचा प्रयत्न असेल. केकेआरची टीम या हाफमध्ये सलग दोन विजयासह फॉर्मात आहे. केकेआरच्या आंद्रे रसेचं (Andre Russell) चेन्नईसमोर आव्हान असेल. चेन्नईविरुद्ध रसेलचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याची चेन्नई विरुद्ध सरारसरी 46 पेक्षा जास्त असून सीएसके विरुद्ध मागच्या 6 मॅचमध्ये त्यानं 4 अर्धशतक झळकावले आहेत. MI vs RCB: क्रिकेट फॅन्ससाठी Super Sunday, टीम इंडियाचे 2 कॅप्टन आमने-सामने CSK vs KKR Dream 11 कॅप्टन - फाफ ड्यू प्लेसिस व्हाईस कॅप्टन - आंद्रे रसेल बॅट्समन - फाफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी विकेट किपर - महेंद्रसिंह धोनी ऑल राऊंडर्स - आंद्रे रसेल, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो बॉलर - वरुण चक्रवर्ती, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन IPL 2021: मॉर्गनची चालाखी पुन्हा उघड, मुंबईला हरवण्यासाठी घेतली 'कोड वर्ड'ची मदत VIDEO संभाव्य प्लेईंग 11 KKR : शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी  नितिश राणा, इयन मॉर्गन (कॅप्टन), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, सुनील नरीन, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा CSK : फाफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूल, दीपक चहर आणि जोश हेजलवूड
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, KKR

    पुढील बातम्या