Home /News /sport /

IPL 2021 : दुसऱ्या टप्प्यात कुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळलं तर काय होणार? वाचा BCCI चे नियम

IPL 2021 : दुसऱ्या टप्प्यात कुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळलं तर काय होणार? वाचा BCCI चे नियम

आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या उद्रेकामुळे 29 मॅचनंतर स्थगित (IPL 2021 Postponed) करण्यात आली होती. या अनुभवातून धडा घेत बीसीसीआयनं (BCCI) दुसऱ्या टप्प्यासाठी कडक नियम जारी केले आहेत.

    मुंबई, 9 ऑगस्ट : आयपीएल 2021 स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021 2nd Phase) 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरु होत आहे. ही स्पर्धा कोरोनाच्या उद्रेकामुळे 29 मॅचनंतर स्थगित (IPL 2021 Postponed) करण्यात आली होती. या अनुभवातून धडा घेत बीसीसीआयनं (BCCI)  दुसऱ्या टप्प्यासाठी कडक नियम जारी केले आहेत.  या सामन्यांना कोरोनाचा कोणताही अडथळा येऊ नये म्हणून या नियमांचं सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसंच अन्य सदस्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पालन करावे लागेल. या सर्व काळजीनंतरही एखादा खेळाडू  किंवा सपोर्ट स्टाफमधील व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर काय होणार? याची गाईडलाईन बीसीसीआयनं जारी केली आहे. काय आहेत निर्देश? बीसीसीआयच्या आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉलनुसार युएईमधील आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर त्याला किमान 10 दिवस आयसोलेशनमध्ये जावं लागेल. आयसोलेशन कालावधीमधील 9 व्या आणि 10 व्या दिवशी  त्या खेळाडूची आरटी-पीसीआर टेस्ट होईल. 24 तासांच्या आत  दोन टेस्टमध्ये रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्याला पुन्हा एकदा बायो-बबलमध्ये प्रवेश मिळेल. त्याचबरोबर कोरोना संक्रमित खेळाडूमध्ये कोणत्याही प्रकारचे लक्षणे आढळता कामा नयेत. तसंच त्याची औषधं बंद होण्यासाठी किमान एक दिवसांपेक्षा जास्त कालावधी होणे आवश्यक आहे, असे बीसीसीआयनं स्पष्ट केले आहे. धक्कादायक! टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूवर आली मजुरीची वेळ कोरोनाची यापूर्वी लागण झालेल्या खेळाडूंचा फाल्स रिपोर्ट आल्यानंतर त्याची सिरोलॉजी टेस्ट तसंच आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात येईल. आयपीएलसाठी एकूण 14 बायो-बबल बनवण्यात आले आहेत. यापैकी 8 टीमसीठी 3 मॅच ऑफिशियल्ससाठी आणि 3 ब्रॉडकास्टर्स आणि कॉमेंट्रेटर्ससाठी असतील. आयपीएल स्पर्धेचा पहिला टप्पा 9 एप्रिल रोजी सुरू झाला होता. 29 सामन्यांनतर वेगवेगळ्या टीममधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानं ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे आता दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, IPL 2021

    पुढील बातम्या