मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: धोनी, रोहितच्या टीममधील जागा भरल्या, 'या' 4 टीमची चिंता कायम

IPL 2021: धोनी, रोहितच्या टीममधील जागा भरल्या, 'या' 4 टीमची चिंता कायम

आयपीएल 2021 स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021 2nd Phase) सुरू होण्यासाठी आता एक महिन्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे सर्वच टीमची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

आयपीएल 2021 स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021 2nd Phase) सुरू होण्यासाठी आता एक महिन्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे सर्वच टीमची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

आयपीएल 2021 स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021 2nd Phase) सुरू होण्यासाठी आता एक महिन्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे सर्वच टीमची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

मुंबई, 24 ऑगस्ट : आयपीएल 2021 स्पर्धेचा दुसरा टप्पा (IPL 2021 2nd Phase) सुरू होण्यासाठी आता एक महिन्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे सर्वच टीमची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महेंद्र सिंह धोनीची चेन्नई सुपर किंग्स (CSK) तसंच रोहित शर्माची मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या टीममधील जागा आता पूर्ण झाल्या आहेत. मात्र अजूनही आयपीएलमधील चार टीमची चिंता संपलेली नाही.

मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार टीममधील सर्व जागा भरल्या आहेत. हैदराबादच्या टीमला काही दिवसांपूर्वी टेन्शन होतं. पण, जॉन बेअरस्टो  (Jonny Bairstow), डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि केन विल्यनसन (Kane Williamson) यांनी खेळण्यास होकार दिल्यानं हैदराबादचं टेन्शन दूर झालं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB), पंजाब किंग्ज (Punjab Kings), राजस्थान रॉयल्स (RR) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या टीममधील अजूनही काही जागा रिक्त आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : आरसीबीच्या 4 खेळाडूंनी दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली आहे. केन रिचर्डसन, एडम झम्पा, डॅनियल सॅम्स आणि फिन एलन यांनी माघार घेतली आहे. त्यांच्या जागी वानिंदू हसरंगा, दुश्मंता चामिरा आणि टीम डेव्हिडचा आरसीबीनं समावेश केला आहे. तर केन रिचर्डसनच्या पर्यायी खेळाडूचा शोध अजून संपलेला नाही.

कोलकाता नाईट रायडर्स : केकेआर पॅट कमिन्सच्या बदली खेळाडूच्या शोधात आहेत. कमिन्स लवकरच बाप होणार आहे. त्यामुळे तो दुसऱ्या टप्प्यात खेळणार नाही.

राजस्थान रॉयल्स : राजस्थानच्या जोफ्रा आर्चरनं (Jofra Archer) आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्याचा बदली खेळाडू एण्ड्रयू टाय खेळणार का हे आणखी स्पष्ट झालेलं नाही. तसंच विकेटकिपर-बॅट्समन जोस बटलर दुसऱ्या टप्प्यात खेळणार नाही. त्याचा बदली खेळाडू म्हणून ग्लेन फिलिपला (Glenn Philip) करारबद्ध करण्यात आलंय.

'मला तेंव्हा असं वाटलं की...' बुमराहच्या तिखट स्पेलवर जेम्स अँडरसनची पहिली प्रतिक्रिया

पंजाब किंग्ज:  पंजबाला झाय रिचर्डसन (Jhye Richardson) आणि  राइली मेरेडिथ (Riley Meredith) यांच्या बदली खेळाडूचा शोध आहे. पंजाबनं नॅथल एलिसला (Nathan Ellis) करारबद्ध केलं आहे. त्यांना आणखी एका फास्ट बॉलरची गरज आहे. याबाबतचा अंतिम निर्णय कोच अनिल कुंबळे घेणार आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, IPL 2021