Home /News /sport /

IPL 2021: 10 मिनिटांच्या बैठकीत झाला स्थगितीचा निर्णय, वाचा Inside Story

IPL 2021: 10 मिनिटांच्या बैठकीत झाला स्थगितीचा निर्णय, वाचा Inside Story

आयपीएलच्या 14 व्या सिझनचे (IPL 2021) आयोजन करण्यासाठी महिनाभर आधीपासूनच योजना तयार करण्यात आली होती. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कडक बायो-बबलमध्ये ठेवण्यात आले. ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय 10 मिनिटांमध्ये झाला.

    मुंबई, 5 मे : आयपीएलच्या 14 व्या सिझनचे (IPL 2021) आयोजन करण्यासाठी महिनाभर आधीपासूनच योजना तयार करण्यात आली होती. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कडक बायो-बबलमध्ये ठेवण्यात आले. या सर्व महिनाभराच्या कष्टाला कोरोनाची नजर पडली आणि फक्त 10 मिनिटांच्या व्हिडीओ कॉलद्वारे (Video Conference) झालेल्या बैठकीत आयपीएल स्थगित (IPL 2021 Suspended) करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही संपूर्ण स्पर्धा मुंबईमध्ये शिफ्ट करण्यात येईल असे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते, मात्र या प्रकारच्या कोणत्याही प्रस्तावावर बैठकीत चर्चा झाली नाही, अशी माहिती बीसीसीआयचे (BCCI) सचिव अरुण धूमल (Arun Dhumal) यांनी दिली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'नं दिलेल्या वृत्तानुसार, सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि दिल्ली कॅपिटल्सचा (DC)  अमित मिश्रा (Amit Mishra) या दोघांचा कोरोना रिपोर्ट मंगळवारी पॉझिटीव्ह आला. त्यानंतर बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या 10 मिनिटाच्या व्हिडीओ कॉलच्या बैठकीत आयपीएल स्थगित करण्याता निर्णय झाला. 'या बैठकीत संपूर्ण स्पर्धा मुंबईत हलवण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. इतक्या कमी कालावधीमध्ये आयपीएल मुंबईत शिफ्ट होणे शक्य नव्हते, ' असं धूमल यांनी स्पष्ट केले. IPL स्थगित, रद्द नाही कोलकाता नाईट रायडर्सचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या दोन खेळाडूंना सोमवारी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचे बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी यांच्यासह सपोर्ट स्टाफही कोरोना पॉझिटीन्ह आढळले. या प्रकारच्या परिस्थितीचा अंदाज आला नाही, असं धूमल यांनी मान्य केलं. IPL 2021 : आयपीएल स्थगित झाल्यानंतर BCCI ला आणखी एक धक्का, झालं मोठं नुकसान IPL 2021 चा सिझन स्थगित करण्यात आला आहे, रद्द नाही. असं बीसीसीआयनं स्पष्ट केलंय. आता बोर्ड या टी20 लीगसाठी नव्या विंडोचा शोध घेत आहे. ही स्पर्धा टी20 वर्ल्ड कपपूर्वी किंवा नंतर खेळवली जाऊ शकते, आम्ही यासाठी विंडोचा शोध घेत आहोत, असं आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे संचालक ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Coronavirus, IPL 2021

    पुढील बातम्या