स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 मध्ये भारताला मिळाला नवा युवी! जम्मू-काश्मीरच्या या युवा खेळाडूचे दिग्गजही झाले फॅन

IPL 2020 मध्ये भारताला मिळाला नवा युवी! जम्मू-काश्मीरच्या या युवा खेळाडूचे दिग्गजही झाले फॅन

माजी भारतीय क्रिकेटर युवराज सिंग याच्या सारखाच ऑलराउंडर असणाऱ्या या खेळाडूचे दिग्गज क्रिकेटपटूंकडून कौतुक होत आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर: आयपीएल टी-20 (IPL 2020) क्रिकेट स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अनेक नवीन प्रतिभावान खेळाडू दिसून आले. यामध्ये जम्मू आणि काश्मीरचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल समद (Abdul Samad) याने देखील उत्कृष्ट खेळी केली. युवराजसारखा ऑलराउंडर असणाऱ्या समदची स्टाइलही त्याच्यासारखीच असल्याने त्याचे विशेष कौतुकही झाली. विशेष म्हणजे स्वत: युवीने देखील समदचे कौतुक केले आहे.

समदने या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादसाठी  (Sunrisers Hyderabad) महत्त्वाची कामगिरी केली आहे. पदार्पणाच्या आयपीएलमध्येच त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संघात संधी मिळाल्यानंतर काही सामन्यांतच त्याने संघात मिडल ऑर्डरचा प्रमुख खेळाडू म्हणून आपले स्थान पक्के केले आहे. समद याच्या शानदार खेळीने भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण  (Irfan Pathan) आणि ऑलराउंडर युवराज सिंग (Yuvraj Singh) यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भविष्यात तो उत्तम खेळाडू म्हणून चमकण्याची आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

(हे वाचा-IPL 2021मध्ये होणार आतापर्यंतचा सर्वात मोठा लिलाव! 8 नाही तर खेळणार 9 संघ)

अब्दुल समद हा आयपीएल खेळणारा जम्मू काश्मीरचा तिसराच खेळाडू आहे. या स्पर्धेत क्वालिफायर-2 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्याविरुद्ध त्याने 16 बॉलमध्ये 33 धावांची शानदार खेळी केली. यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकारदेखील मारले. परंतु या सामन्यात त्यांचा पराभव झाला. हैदराबादने दिल्लीला 189 धावांमध्ये रोखले. परंतु हैदराबादच्या फलंदाजांना या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयश आले आणि त्यांचा 17 धावांनी पराभव झाला. त्यांना केवळ 172 धावाच करता आल्या. समदच्या या खेळीने प्रभावित झालेल्या इरफान पठाणने  ट्वीट करून असे लिहले आहे की, ‘हो, सनरायझर्स हैदराबादसाठी  त्याने सामना जिंकायला पाहिजे होता, परंतु त्याने ज्या पद्धतीने आपली शक्ती आणि खेळ दाखवला त्याचा मला अभिमान आहे.’ देशांतर्गत क्रिकेटमध्ये जम्मू-काश्मीर संघाचा सल्लागार म्हणून काम करत असताना इरफानने अब्दुलमधील प्रतिभा ओळखली होती.

त्याचबरोबर युवराज सिंग देखील त्याची कामगिरी पाहून प्रभावित झाला आहे. त्याने या खेळाडू स्पेशल ठरेल असं ट्वीट त्याने केले आहे. त्याने दिल्लीविरुद्ध शानदार खेळी केल्याचंही तो म्हणाला. यावर इरफानने देखील उत्तर देत म्हटले,  ‘हो भावा त्याच्याकडे प्रतीभा आहे. त्याने यावर लक्ष केंद्रित करून उत्तम कामगिरी करणं गरजेचं आहे.’

हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत विंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याने देखील अब्दुल समद याचं कौतुक केलं होतं. त्याच्या कामगिरीने तो प्रभावित झाला आहे. 19 वर्षीय समद याने या स्पर्धेत 12 मॅचमध्ये 22.20 च्या सरासरीने 111 रन केल्या आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट हा 170.76 होता. यामध्ये 8 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 11, 2020, 4:19 PM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या