Home /News /sport /

IPL 2020 : '...तोपर्यंत तुम्ही चोरी रोखू शकत नाही', अश्विनकडून 'त्या' खेळाडूंची चोरांशी तुलना

IPL 2020 : '...तोपर्यंत तुम्ही चोरी रोखू शकत नाही', अश्विनकडून 'त्या' खेळाडूंची चोरांशी तुलना

आयपीएल 2020 (IPL 2020) मधल्या मंकडिंगच्या वादावर दिल्ली (Delhi Capitals)चा बॉलर अश्विन (Ashwin)याने उत्तर दिलं आहे.

    दुबई, 09 ऑक्टोबर : आयपीएल 2020 (IPL 2020) मधल्या मंकडिंगच्या वादावर दिल्ली (Delhi Capitals)चा बॉलर अश्विन (Ashwin)याने उत्तर दिलं आहे. बैंगलोर (RCB)च्या मॅचवेळी अश्विनने बॉल टाकण्याआधीच एरॉन फिंच क्रिजच्या बाहेर आला होता. त्यावेळी अश्विनने एरॉन फिंचला इशारा दिला होता. मागच्या वर्षी पंजाबकडून खेळणाऱ्या अश्विनने राजस्थानच्या जॉस बटलरला असंच आऊट केलं होतं, पण यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. यंदाच्या वर्षी पंजाबने अश्विनला दिल्लीकडे ट्रान्सफर केलं. पण दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉण्टिंगने अश्विनला मंकडिंग करु नकोस असं सांगितलं. त्यामुळे अश्विनने फिंचला ताकीद दिली. आपल्या युट्यूबच्या कार्यक्रमात बोलताना अश्विनने मंकडिंगच्या वादावर पुन्हा भाष्य केलं आहे. जे चूक आहे, ते चूकच मानलं जावं, असं अश्विन म्हणाला आहे. चोरांना पश्चाताप होत नाही, तोपर्यंत तुम्ही चोरी रोखू शकत नाही. आणि मी कायम पोलिसांची भूमिका बजावू शकत नाही, असं अश्विन म्हणाला आहे. पॉण्टिंगनेही आपण याबाबत आयसीसीशी बोलणार आहे. तसंच बॉल पडण्याच्या आत नॉन स्ट्रायकर एन्डचा बॅट्समन क्रिजबाहेर आला तर त्यावर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही पॉण्टिंग आयसीसीकडे करणार असल्याचं अश्विनने सांगितलं. बॉल पडण्याच्या आधीच क्रिज बाहेर आल्यास टीमला 10 रनची पेनल्टी देण्यात यावी, अशी मागणी अश्विनने केली आहे. बैंगलोरविरुद्धच्या मॅचनंतर अश्विनने ट्विट केलं. '2020 चा हा पहिला आणि शेवटचा इशारा. मी हे अधिकृतरित्या सांगतोय, नंतर मला दोष देऊ नका. मी आणि फिंच हे चांगले मित्र आहोत. हे आता स्पष्ट करतो, असं अश्विन म्हणाला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या