Home /News /sport /

IPL 2020 : छोट्या मैदानात दिल्लीची टिच्चून बॉलिंग, राजस्थानचा आणखी एक पराभव

IPL 2020 : छोट्या मैदानात दिल्लीची टिच्चून बॉलिंग, राजस्थानचा आणखी एक पराभव

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात राजस्थान (Rajasthan Royals)चा आणखी एक पराभव झाला आहे. शारजाहच्या छोट्या मैदानात दिल्ली (Delhi Capitals)च्या बॉलरनी टिच्चून बॉलिंग करत राजस्थानला 46 रननी नमवलं.

    शारजाह : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात राजस्थान (Rajasthan Royals)चा आणखी एक पराभव झाला आहे. शारजाहच्या छोट्या मैदानात दिल्ली (Delhi Capitals)च्या बॉलरनी टिच्चून बॉलिंग करत राजस्थानला 46 रननी नमवलं. दिल्लीने ठेवलेल्या 185 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा 19.4 ओव्हरमध्ये 138 रनवर ऑल आउट झाला. दिल्लीकडून रबाडाला 3 विकेट मिळाल्या, तर अश्विन आणि स्टॉयनिसला प्रत्येकी 2-2 आणि नोर्टजे, हर्षल पटेल आणि अक्सर पटेल यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. शारजाहच्या खेळपट्टीवर 200 रनच्या खालचं आव्हान म्हणजे सुरुवातीला माफक वाटत होतं, पण राजस्थानला मात्र याच्या जवळही जाता आलं नाही. राजस्थानकडून सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या राहुल तेवतियाने सर्वाधिक 38 रन केले. या मॅचमध्ये राजस्थानने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. राजस्थानच्या बॉलरनीही त्यांचा कर्णधार स्टीव्ह स्मिथचा हा निर्णय योग्य ठरवला. सुरुवातीपासूनच राजस्थानने दिल्लीला धक्के दिले. हेटमायर आणि मार्कस स्टॉयनिस यांनी दिल्लीला 184 पर्यंत पोहोचवलं. हेटमायरने 24 बॉलमध्ये 45 आणि स्टॉयनिसने 30 बॉलमध्ये 39 रन केले. राजस्थानच्या जोफ्रा आर्चरला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या. तर कार्तिक त्यागी, ऍन्ड्रू टाय आणि राहुल तेवतिया यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेता आली. राजस्थानचा यंदाच्या मोसमातला हा चौथा तर शारजाहमधला पहिला पराभव आहे. राजस्थानने आतापर्यंत 6 पैकी फक्त 2 मॅच जिंकल्या आहेत. या दोन्ही मॅचमधला विजय शारजाहच्या मैदानातच आला होता. आज मात्र त्यांना शारजाहचं मैदान फळलं नाही. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम सातव्या क्रमांकावर आहे. तर या विजयामुळे दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईला मागे टाकत पुन्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. दिल्लीने 6 मॅचपैकी 5 मॅच जिंकल्या तर फक्त 1 मॅचमध्येच त्यांचा पराभव झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या