Home /News /sport /

IPL 2020 : ...म्हणून रोहित शर्मा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला आला नाही

IPL 2020 : ...म्हणून रोहित शर्मा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला आला नाही

आयपीएल (IPL 2020) च्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशी 3 सुपर ओव्हरचा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. दुपारी हैदराबाद (SRH) आणि कोलकाता (KKR) यांच्यातल्या मॅचचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागल्यानंतर रात्री मुंबई (Mumbai Indians) आणि पंजाब (KXIP) च्या मॅचमध्ये तर दोन सुपर ओव्हर झाल्या. मुंबईकडून दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) बॅटिंगला आला नाही.

पुढे वाचा ...
     दुबई, 19 ऑक्टोबर: आयपीएल (IPL 2020) च्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशी 3 सुपर ओव्हरचा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. दुपारी हैदराबाद (SRH) आणि कोलकाता (KKR) यांच्यातल्या मॅचचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागल्यानंतर रात्री मुंबई (Mumbai Indians) आणि पंजाब (KXIP) च्या मॅचमध्ये तर दोन सुपर ओव्हर झाल्या. मुंबईने ठेवलेल्या 177 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 20 ओव्हरमध्ये 176 रनच करता आले. त्यामुळे या मॅचमध्ये सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करायला आलेल्या पंजाबला बुमराहने फक्त 5 रनच करुन दिले. केएल राहुल, निकोलास पूरन आणि दीपक हुडा यांनी पंजाबसाठी बॅटिंग केली. यानंतर 6 रनचा पाठलाग करायला आलेल्या मुंबईच्या रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉकला मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर 5 रनच करता आल्यामुळे ही मॅच पुन्हा टाय झाली आणि पुन्हा एकदा सुपर ओव्हरला सुरुवात झाली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड सुपर ओव्हरला बॅटिंग करायला आले. पण अनेकांना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बॅटिंगला का आला नाही? असा प्रश्न पडला. सुपर ओव्हरच्या नियमानुसार पहिली सुपर ओव्हर जर टाय झाली तर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पहिल्या सुपर ओव्हरसाठी वापरलेले खेळाडू पुन्हा वापरता येत नाहीत. त्यामुळेच मुंबईने रोहित आणि डिकॉकच्याऐवजी पोलार्ड आणि हार्दिक पांड्याला बॅटिंगला पाठवलं. हार्दिकची विकेट गेल्यानंतर सूर्यकुमार यादव बॅटिंगला आला. मुंबईला या सुपर ओव्हरमध्ये 11 रन करता आले. सुपर ओव्हरच्या हा नियमामुळे पंजाबनेही दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मयंक अग्रवाल आणि क्रिस गेलला बॅटिंगला पाठवलं. सुपर ओव्हरचा हा नियम बॉलरनाही लागू होत असल्यामुळे मुंबईने बुमराह आणि बोल्ट तर पंजाबने मोहम्मद शमी आणि क्रिस जॉर्डनला बॉलिंग दिली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने पंजाबला 12 रनचं आव्हान दिलं, पण ट्रेन्ट बोल्टला हे आव्हान रोखता आलं नाही. गेलने एक सिक्स, तर मयंकने दोन फोर मारून पंजाबला विजय मिळवून दिला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या