IPL 2020 : ...म्हणून क्रिकेटपटू दोन टोप्या घालून मैदानात दिसत आहेत

IPL 2020 : ...म्हणून क्रिकेटपटू दोन टोप्या घालून मैदानात दिसत आहेत

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात खेळाडू दोन टोप्या घालून मैदानात दिसत आहेत. या मागचं नेमकं कारण आता समोर आलं आहे.

  • Share this:

दुबई, 22 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)चा यंदाचा मोसम युएईमध्ये सुरू आहे. कोरोना व्हायरस (Corona Virus) संबंधित निर्बंध कमी करण्यात आल्यानंतर क्रिकेट स्पर्धा जगभरात होण्यास सुरुवात झाली. पण कोरोनामुळे आता खेळण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आले आहेत. आयसीसीने कोरोनाचा धोका टाळण्यासाठी खेळाडू आणि संबंधित सदस्यांसाठी सुरक्षिततेचे नवे नियम तयार केले आहेत. आयसीसीच्या याच नियमामुळे आयपीएलमध्ये अनेक खेळाडू डोक्यावर दोन टोप्या घालून खेळताना दिसत आहेत.

आयसीसीच्या नियमांनुसार खेळाडूंनी टोपी, टॉवेल किंवा गॉगल यांच्यासारख्या कोणत्याही गोष्टी अंपायरकडे द्यायच्या नाहीत. प्रत्येक खेळाडूने स्वत:च्या वस्तूची जबाबदारी घ्यावी. कोरोनाच्या आधी बॉलिंग करताना खेळाडू त्याचा गॉगल, टोपी आणि टॉवेल यांच्यासारख्या वस्तू अंपायरकडे द्यायचा, पण आता बॉलरला या वस्तू आपल्या सहकाऱ्याकडे द्याव्या लागत आहेत, त्यामुळे बरेच वेळा फिल्डिंग करत असलेल्या खेळाडूच्या डोक्यात दोन टोप्या दिसत आहेत.

गेल्या महिन्यात इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सीरिजवेळी इऑन मॉर्गन आणि ॲरोन फिंच हे सामन्यादरम्यान दोन टोप्या घालून खेळताना दिसले. आयपीएलमध्येही अशाच प्रकारची दृष्यं दिसत आहेत. बुधवारी झालेल्या कोलकाता आणि बँगलोर यांच्या सामन्यादरम्यान कोलकत्याचा कर्णधार मॉर्गन हा दोन टोप्या घातलेल्या दिसून आला.

आयपीएल 2020 ही स्पर्धा कोरोनामुळे स्टेडियममध्ये चाहात्यांच्या उपस्थितीशिवाय खेळवली जात आहे. याव्यतिरिक्त खेळाडूंना आणि संबंधितांना संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी कडक नियम लावण्यात आले आहेत. आयपीएलशी संबंधित असणाऱ्या सगळ्यांना जैव सुरक्षिततेमध्ये राहावं लागत आहे. त्यामुळे खेळाडूंना विकेट घेतल्यानंतर किंवा मॅच जिंकल्यानंतरही एकमेकांना स्पर्श करून जल्लोष करता येत नाही.

Published by: Shreyas
First published: October 22, 2020, 9:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या