मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : ...म्हणून रोहित शर्माशिवाय मुंबईची टीम मैदानात उतरली

IPL 2020 : ...म्हणून रोहित शर्माशिवाय मुंबईची टीम मैदानात उतरली

आयपीएल (IPL 2020) च्या चेन्नई (CSK)विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)त्यांचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)शिवाय मैदानात उतरली आहे.

  • Published by:  Shreyas

शारजाह, 23 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या चेन्नई (CSK)विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)त्यांचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)शिवाय मैदानात उतरली आहे. रोहित शर्माऐवजी कायरन पोलार्डकडे मुंबईचं नेतृत्व देण्यात आलं आहे. रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे तो या मॅचमध्ये खेळू शकला नाही.

मुंबईची याआधीची मॅच पंजाबविरुद्ध झाली होती. दोन सुपर ओव्हर झालेल्या या मॅचमध्ये पंजाबने मुंबईचा पराभव केला होता. या मॅचनंतर बोलताना कायरन पोलार्डने रोहित शर्माला बरं नसल्याचं सांगितलं होतं, पण त्याने रोहितच्या दुखापतीबद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती. आजही चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये टॉसवेळी पोलार्डने रोहितची तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं.

आता मुंबईच्या टीम प्रशासनाने रोहितच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. 'रोहित शर्माच्या डाव्या मांडीच्या मागच्या स्नायूवर ताण आला आहे. पंजाबविरुद्धच्या मॅचवेळी रोहित शर्माला ही दुखापत झाली. मागच्या 4 दिवसांमध्ये रोहितच्या दुखापतीमध्ये सुधारणा होत आहे. बीसीसीआयची सल्लामसलत करुन आम्ही रोहितच्या दुखापतीवर प्रत्येक दिवशी देखरेख करत आहोत', असं मुंबई इंडियन्सकडून सांगण्यात आलं.

रोहित शर्मा हा बीसीसीआयशी करारबद्ध खेळाडू आहे. नियमानुसार बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली, तर त्याच्या दुखापतीची माहिती बीसीसीआयच्या मेडिकल टीमला द्यावी लागते. बीसीसीआयच्या मेडिकल टीमशी सल्लामसलत करुन मग खेळाडूवर उपचार केले जातात.

रोहित शर्मा यंदाच्या मोसमात मुंबईकडून सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 9 मॅचच्या 9 इनिंगमध्ये 129.35 च्या स्ट्राईक रेटने 260 रन केले, यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

First published: