Home /News /sport /

IPL 2020 : ...म्हणून फायनलमध्ये चहरऐवजी जयंत यादवला संधी, रोहितने सांगितलं कारण

IPL 2020 : ...म्हणून फायनलमध्ये चहरऐवजी जयंत यादवला संधी, रोहितने सांगितलं कारण

रोहितच्या निर्णयाबद्दल बोलताना आपली चूक झाल्याची जाहीर कबुली सुनील गावस्कर यांनी दिली. त्यावर स्वतःलाच शिक्षा देत असल्याचं सांगत षटकातील उर्वरित चेंडूंवर काहीही बोलणार नाही असं म्हटलं.

रोहितच्या निर्णयाबद्दल बोलताना आपली चूक झाल्याची जाहीर कबुली सुनील गावस्कर यांनी दिली. त्यावर स्वतःलाच शिक्षा देत असल्याचं सांगत षटकातील उर्वरित चेंडूंवर काहीही बोलणार नाही असं म्हटलं.

आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये दिल्ली (Delhi Capitals)विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)ने त्यांच्या टीममध्ये एक बदल केला. मुंबईने लेग स्पिनर राहुल चहर (Rahul Chahar) ऐवजी जयंत यादव (Jayant Yadav)ला टीममध्ये घेतलं.

    दुबई, 10 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये दिल्ली (Delhi Capitals)विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)ने त्यांच्या टीममध्ये एक बदल केला. मुंबईने लेग स्पिनर राहुल चहरच्याऐवजी जयंत यादवला टीममध्ये घेतलं. रोहित शर्माने टॉसवेळी सांगितलेला हा बदल ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण टॉसवेळीच रोहित शर्मा (Rohit Sharma) ने जयंत यादवला टीममध्ये घ्यायचं कारण सांगितलं. दिल्लीच्या टीममध्ये डावखुऱ्या बॅट्समनची संख्या जास्त असल्यामुळे चहरऐवजी जयंत यादवला संधी दिल्याचं रोहितने सांगितलं. दिल्लीच्या टीममध्ये शिखर धवन, ऋषभ पंत, शिमरन हेटमायर आणि अक्सर पटेल हे सुरुवातीच्या 7 बॅट्समनपैकी 4 बॅट्समन डावखुरे आहेत. जयंत यादव (Jayant Yadav) हा ऑफ स्पिनर आहे. डावखुऱ्या बॅट्समनला ऑफ स्पिनरसमोर खेळताना अडचणी येतात, तर लेग स्पिनरना खेळणं त्यांच्यासाठी सोपं असतं, असं सांगितलं जातं, त्यामुळे मुंबईने लेग स्पिनर असलेल्या चहरऐवजी जयंत यादवला खेळवण्याचा धोका पत्करला. जयंत यादव यानेही त्याला मिळालेल्या संधीचा फायदा उचलला. या मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शिखर धवनला यादवने माघारी धाडलं. 13 बॉलमध्ये 15 रन करणाऱ्या धवनला जयंत यादवने बोल्ड केलं. दुसरीकडे राहुल चहर (Rahul Chahar) ने मात्र या मोसमात चांगली कामगिरी केली होती. राहुल चहरने या मोसमात खेळलेल्या 15 मॅचमध्ये 8.16 चा इकोनॉमी रेट आणि 28.86 च्या सरासरीने 15 विकेट घेतल्या होत्या. राहुल चहरला फायनल मॅचसाठी बाहेर बसवताना वाईट वाटत आहे, त्याने मोसमात उत्तम कामगिरी केली, पण रणनीती म्हणून आम्ही जयंत यादवला खेळवत असल्याची प्रतिक्रिया रोहित शर्माने दिली. जयंत यादवला यंदाच्या मोसमात या मॅचआधी आणखी एक मॅच खेळण्याची संधी मिळाल होती. तर मागच्यावर्षी चेन्नईविरुद्ध झालेल्या प्ले-ऑफमध्येही जयंत यादवने चांगली कामगिरी केली होती. जयंत यादव 2015 सालापासून आतापर्यंत एकूण 14 मॅच खेळला आहे, यात त्याला 6 विकेट मिळाल्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या