IPL 2020 : ...म्हणून हार्दिक पांड्या बॉलिंग करत नाही, रोहितने सांगितंल कारण

IPL 2020 : ...म्हणून हार्दिक पांड्या बॉलिंग करत नाही, रोहितने सांगितंल कारण

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमाची फायनल मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्ली (Delhi Capitals)यांच्यात होणार आहे. या संपूर्ण मोसमात मुंबईचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya)याने बॉलिंग केली नाही.

  • Share this:

दुबई, 9 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमाची फायनल मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्ली (Delhi Capitals)यांच्यात होणार आहे. या संपूर्ण मोसमात मुंबईचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya)याने बॉलिंग केली नाही. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)याला याबद्दलच प्रश्न विचारण्यात आला. हार्दिक पांड्या अजूनही स्वत:ला बॉलिंग करण्यासाठी समर्थ मानत नसल्याचं रोहित म्हणाला आहे. हार्दिकने बॉलिंग करण्यासाठी सक्षम होण्याएवढा फिटनेसचा स्तर गाठलेला नाही. बॉलिंग करण्याचा निर्णय आम्ही सर्वस्वी त्याच्यावर सोडला आहे, अशी प्रतिक्रिया रोहितने दिली.

'हार्दिकला सध्या बॉलिंग करण्यासाठी काही अडचणी आहेत. जर तो बॉलिंग करण्यासाठी फिट झाला तर मला आनंदच होईल. संपूर्ण मोसमात आम्ही त्याला फिटनेसवर लक्ष द्यायला सांगितलं आणि त्यानेही हे काम चांगलं केलं. प्रत्येक तीन-चार मॅचनंतर आम्ही त्याच्या फिटनेसची समिक्षा केली. त्याला नेमकं काय हवं आहे, याबद्दलही त्याच्याशी चर्चा करण्यात आली,' असं रोहित म्हणाला.

'आम्हाला खेळाडूंवर कोणताही दबाव टाकायचा नाही. आम्ही खेळाडूंकडून अपेक्षा ठेवल्या आणि त्या पूर्ण करण्यात जर खेळाडू अपयशी ठरला तर त्याचं मनोबल तुटून जातं. हार्दिक आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याची बॅटिंग आमच्यासाठी महत्त्वाची आहे. जोपर्यंत तो बॅटने योगदान देत आहे, तोपर्यंत आम्ही खूश आहोत', असं वक्तव्य रोहितने केलं. हार्दिक पांड्यावर मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ब्रिटनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. हार्दिकच्या पाठीच्या खालचा भाग 2018 पासूनच दुखत होता.

Published by: Shreyas
First published: November 9, 2020, 9:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या