IPL 2020 : ...म्हणून दिल्लीची टीम काळी पट्टी बांधून मैदानात उतरली

IPL 2020 : ...म्हणून दिल्लीची टीम काळी पट्टी बांधून मैदानात उतरली

आयपीएल (IPL 2020)च्या प्ले-ऑफमध्ये मुंबई (Mumbai Indians)विरुद्धच्या सामन्यात दिल्ली (Delhi Capitals)ची टीम दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरली.

  • Share this:

दुबई, 5 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या प्ले-ऑफमध्ये मुंबई (Mumbai Indians)विरुद्धच्या सामन्यात दिल्ली (Delhi Capitals)ची टीम दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरली. दिल्लीचा फास्ट बॉलर मोहित शर्मा (Mohit Sharma)याच्या वडिलांचं निधन झालं, त्यामुळे दिल्लीच्या टीमने हाताला काळी पट्टी बांधली होती. वडिलांच्या निधनामुळे मोहित शर्मा भारतामध्ये परतला आहे.

32 वर्षांच्या मोहित शर्माने यंदाच्या मोसमात फक्त एकच सामना खेळला. 20 सप्टेंबरला पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये मोहित शर्माने एक विकेट घेतली होती. या मॅचमध्ये दिल्लीचा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला होता.

मुंबईविरुद्धच्या या मॅचमध्ये दिल्लीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता. दिल्लीने त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केला नाही, तर मुंबईने टीममध्ये 3 बदल केले. जेम्स पॅटिनसन, धवल कुलकर्णी आणि सौरभ तिवारी यांच्याजागी ट्रेन्ट बोल्ट, जसब्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांचं टीममध्ये पुनरागमन झालं.

आयपीएल प्ले-ऑफच्या या मॅचमध्ये ज्या टीमचा विजय होईल, ते फायनलमध्ये प्रवेश करतील. तर पराभव झालेल्या टीमला फायनल गाठण्याची आणखी एक संधी मिळेल. ग्रुप स्टेजला पहिल्या दोन क्रमांकावर राहिल्याचा फायदा या दोन्ही टीमपैकी हरणाऱ्या टीमला मिळेल. बँगलोर आणि हैदराबाद यांच्यातली विजय टीम मुंबई आणि दिल्ली यांच्यापैकी पराभव झालेल्या टीमशी खेळेल. या मॅचमध्ये विजय मिळवलेली टीम फायनल गाठेल.

Published by: Shreyas
First published: November 5, 2020, 9:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या