मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये पोहोचलेल्या मुंबईसाठी ही ठरणार डोकेदुखी?

IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये पोहोचलेल्या मुंबईसाठी ही ठरणार डोकेदुखी?

आयपीएल (IPL 2020) च्या प्ले-ऑफमध्ये मुंबई (Mumbai Indians) ने दिमाखात प्रवेश मिळवला आहे, पण स्पर्धेच्या शेवटच्या भागात एक निर्णय मुंबईसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

आयपीएल (IPL 2020) च्या प्ले-ऑफमध्ये मुंबई (Mumbai Indians) ने दिमाखात प्रवेश मिळवला आहे, पण स्पर्धेच्या शेवटच्या भागात एक निर्णय मुंबईसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

आयपीएल (IPL 2020) च्या प्ले-ऑफमध्ये मुंबई (Mumbai Indians) ने दिमाखात प्रवेश मिळवला आहे, पण स्पर्धेच्या शेवटच्या भागात एक निर्णय मुंबईसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

  • Published by:  Shreyas

दुबई, 1 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या प्ले-ऑफमध्ये मुंबई (Mumbai Indians)ने दिमाखात प्रवेश मिळवला आहे. सोबतच पॉईंट्स टेबलमध्येही मुंबईची टीम यावर्षी पहिल्या क्रमांकावर राहणार हे निश्चित झालं आहे. 5 नोव्हेंबरला मुंबईचा प्ले-ऑफचा सामना दिल्ली (Delhi Capitals) किंवा बँगलोर (RCB)यांच्यापैकी एकासोबत होणार आहे.

आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये मुंबईच्या टीमला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही. यंदाच्या मोसमातला त्यांचा प्रवास अडथळ्यांविनाच झाला आहे. मुंबईचा हुकमी एक्का असलेला रोहित शर्मा (Rohit Sharma)ला दुखापत झाल्यानंतरही मुंबई डगमगली नाही. पोलार्डच्या नेतृत्वात मुंबईने 4 पैकी 3 सामने जिंकले, पण प्ले-ऑफमध्ये मात्र एक निर्णय घेणं मुंबईसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

दिल्लीनंतरच्या सामन्यानंतर कायरन पोलार्डने रोहित शर्माच्या फिटनेसबाबत महत्त्वाची माहिती दिली. रोहित शर्माची दुखापत दिवसेंदिवस बरी होत चालली आहे. तो लवकरच पुनरागमन करेल, आम्ही त्याच्या पुनरागमनासाठी उत्सुक आहोत, असं म्हणत पोलार्डने रोहित कमबॅक करेल, असे संकेत दिले. पण रोहितचं टीममध्ये आगमन झाल्यावर मुंबई त्यांची यशस्वी ठरत असलेली क्विंटन डिकॉक (quinton de kock)  आणि इशान किशन (Ishan Kishan) यांची ओपनिंग जोडी बदलणार का? हा प्रश्न आहे.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये इशान किशनने त्याची कमी जाणवून दिली नाही, किंबहुना आकडे बघितले, तर इशान किशन रोहितपेक्षाही सरस ठरला, त्यामुळे रोहितचं पुनरागमन झालं तर, पुढची रणनीती ठरवताना मुंबईच्या नाकी नऊ येऊ शकतात. रोहित शर्मा सौरभ तिवारीच्या जागी टीममध्ये येईल, पण ओपनिंग जोडीचा निर्णय घेताना मात्र मुंबईची डोकेदुखी वाढू शकते.

यंदाच्या आयपीएलमध्ये क्विंटन डिकॉकनंतर इशान किशन हा मुंबईचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू आहे. डिकॉकने 13 मॅचमध्ये 38 च्या सरासरीने आणि 135.71 च्या स्ट्राईक रेटने 418 रन केले आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तर ईशान किशनने 11 मॅचमध्येच 49.37 च्या सरासरीने आणि 143.63 च्या सरासरीने 395 रन केले आहेत, यामध्ये 3 अर्धशतकं आहेत. या मोसमात इशान किशनचं शतक फक्त 1 रनने हुकलं.

रोहित शर्माने या मोसमातल्या 9 मॅचमध्ये 28.88 च्या सरासरीने आणि 129.35 च्या स्ट्राईक रेटने 260 रन केले. रोहितला या मोसमात 2 अर्धशतकं करता आली.

रोहित आणि डिकॉक

रोहित आणि डिकॉक यांच्या ओपनिंग जोडीने मुंबईला 46, 8, 14, 0, 6, 49, 31, 94, 23 अशा ओपनिंग पार्टनरशीप करून दिल्या. संपूर्ण मोसमात रोहित आणि डिकॉकच्या जोडीने मुंबईला 9 मॅचमध्ये एकूण 271 रनची पार्टनरशीप केली.

डिकॉक आणि इशान

दुसरीकडे इशान किशन आणि डिकॉकच्या जोडीने मुंबईला नाबाद 116, 7, 37, 68 अशा ओपनिंग पार्टनरशीप करून दिल्या. संपूर्ण मोसमात इशान आणि डिकॉकच्या ओपनिंग पार्टनरशीपने 4 मॅचमध्येच 228 रन केल्या.

First published: