मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : लोक म्हणायचे साक्षीचा असिस्टंट, चेन्नईकडून पदार्पण करणारा मोनू कुमार कोण आहे?

IPL 2020 : लोक म्हणायचे साक्षीचा असिस्टंट, चेन्नईकडून पदार्पण करणारा मोनू कुमार कोण आहे?

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)चा अखेर विजय झाला आहे. बँगलोर (RCB)विरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईने 8 विकेटने विजय मिळवला. या मॅचमध्ये धोनीने फास्ट बॉलर मोनू कुमार (Monu Kumar) ला संधी दिली.

    अबु धाबी, 25 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)चा अखेर विजय झाला आहे. बँगलोर (RCB)विरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईने 8 विकेटने विजय मिळवला. या मॅचमध्ये धोनीने फास्ट बॉलर मोनू कुमार (Monu Kumar)ला संधी दिली. मोनू कुमारची ही आयपीएलमधली पहिलीच मॅच होती. धोनीने शार्दुल ठाकूरऐवजी त्याला टीममध्ये स्थान दिलं. 2018 साली मोनूला चेन्नईने टीममध्ये घेतलं होतं, पण चेन्नईकडून खेळायला त्याला 43 मॅच थांबावं लागलं. आपल्या पहिल्याच आयपीएल मॅचमध्ये मोनूने 2 ओव्हरमध्ये 20 रन दिल्या. मोनू कुमार झारखंडची राजधानी रांचीचा राहणारा आहे. रांचीचा असल्यामुळे तो धोनीचा जवळचा आहे. तसंच तो धोनीची पत्नी साक्षी हिलाही ओळखतो. मोनू कुमारचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे, तो साक्षीचा असिस्टंट असल्याचंही बोललं गेलं. धोनीच्या शहरात राहणारा हा फास्ट बॉलर त्याच्या लाईन ऍण्ड लेन्थ आणि अचूक बाऊन्सर टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. 2017 साली धोनीने झारखंडसाठी विजय हजारे ट्रॉफी खेळली होती, त्यावेळी मोनू कुमारही टीममध्ये होता. त्यावेळी मोनूने धोनीसोबत बराच वेळ घालवला आणि धोनीलाही त्याच्यामध्ये प्रतिभा दिसली. याच कारणामुळे 2018 साली जेव्हा चेन्नईचं बंदीनंतर पुनरागमन झालं, तेव्हा धोनीने मोनूला त्याच्या टीममध्ये स्थान दिलं. मोनू वर्ल्ड कपही खेळला मोनू कुमार 2014 सालच्या अंडर-19 वर्ल्ड कपच्या टीममध्येही होता. त्यावेळी संजू सॅमसन, श्रेयस अय्यर आणि सरफराज खान हे खेळाडूही अंडर-19 वर्ल्ड कपच्या भारतीय टीममध्ये होते. मोनू कुमारने लिस्ट ए कारकिर्दीमध्ये 5 रन प्रती ओव्हरच्या इकोनॉमी रेटने रन दिले आहेत. सोबतच टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 6.90 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या