Home /News /sport /

IPL 2020 : 'टाईम-आऊटमध्ये रोहित-महेलाने निरोप पाठवला आणि मग...', पाहा काय म्हणाला सूर्या

IPL 2020 : 'टाईम-आऊटमध्ये रोहित-महेलाने निरोप पाठवला आणि मग...', पाहा काय म्हणाला सूर्या

आयपीएल (IPL 2020)च्या बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई (Mumbai Indians)ने बँगलोर (RCB)वर 5 विकेटने दणदणीत विजय मिळवला. बँगलोरला 164 रनवर रोखल्यानंतर मुंबईने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) च्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला.

पुढे वाचा ...
    अबु धाबी, 29 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई (Mumbai Indians)ने बँगलोर (RCB)वर 5 विकेटने दणदणीत विजय मिळवला. बँगलोरला 164 रनवर रोखल्यानंतर मुंबईने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) च्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. याचसोबत मुंबई आयपीएच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचल्यात जमा आहे. या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने 45 बॉलमध्ये नाबाद 74 रन केले, त्याच्या या खेळीमध्ये 12 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. मॅच संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने त्याच्या या खेळीबद्दल आणि टीमच्या रणनीतीबद्दल सांगितलं. 'टाईम-आऊटमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी निरोप पाठवला आणि जेवढा जास्त वेळ बॅटिंग करता येईल, तेवढी कर मग निकाल आपल्याच बाजूने लागेल,' असं मला सांगण्यात आल्याची प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली. मी टीमसाठी मॅच संपवून आलो याचा आनंद आहे. स्पर्धा सुरू होण्यापासूनच मी या खेळीची वाट बघत होतो, असंही सूर्यकुमार म्हणाला. महेला जयवर्धने यांनीही सूर्यकुमारच्या या खेळीचं कौतुक केलं आहे. सूर्यकुमार यादवचा हा चेन्नईतल्या त्या खेळीनंतरचा सर्वोत्तम खेळ होता. चेन्नईतल्या कठीण परिस्थितीमध्ये विकेट गमावल्यानंतर त्याने केलेली खेळी आणि आजची खेळी या त्याच्या सर्वोत्तम खेळी असल्याचं वक्तव्य जयवर्धने यांनी केलं. सूर्यकुमार यादवने तो किती परिपक्व आहे, हे दाखवून दिलं. वेगवेगळ्या क्रमांकावर बॅटिंग करुन सूर्याने आम्हाला जिंकवून दिलं. या मॅचमध्येही त्याने स्पिनरना योग्य प्रकारे हाताळलं, असंही जयवर्धने यांनी सांगि
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या