IPL 2020 : 63 बॉलमध्ये 120 रन ठोकणारा पॉल वल्थाटी सध्या कुठे आहे?

IPL 2020 : 63 बॉलमध्ये 120 रन ठोकणारा पॉल वल्थाटी सध्या कुठे आहे?

तुम्ही जर आयपीएल (IPL 2020)चे जुने चाहते असाल, तर पॉल वल्थाटी (Paul Valthaty)हे नाव तुम्हाला निश्चितच माहिती असेल. किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab)च्या या खेळाडूने 2011 साली खोऱ्याने रन काढल्या होत्या.

  • Share this:

मुंबई, 7 ऑक्टोबर : तुम्ही जर आयपीएल (IPL 2020)चे जुने चाहते असाल, तर पॉल वल्थाटी (Paul Valthaty)हे नाव तुम्हाला निश्चितच माहिती असेल. किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab)च्या या खेळाडूने 2011 साली खोऱ्याने रन काढल्या होत्या. आपल्या फटकेबाजीमुळे वल्थाटी एका रात्रीत स्टार झाला होता. 2011 च्या मोसमात वल्थाटी जवळपास प्रत्येक बॉलवर आक्रमण करत होता. काही इनिंगमध्येच पॉल वल्थाटी हे नाव उदयाला आलं. वल्थाटीची ही बॅटिंग वादळासारखी होती, पण हे वादळ फक्त एका मोसमापुरतंच मर्यादित राहिलं. एकाच मोसमात बॉलरचं नुकसान करुन हे वादळ निघून गेलं. लोकं 9 वर्षानंतर वल्थाटीचं नाव विसरले आहेत.

पॉल वल्थाटीचं नाव घेतल्यावर त्याने केलेली वादळी खेळीच लक्षात येते, ज्यामुळे तो एका रात्रीत चमकला होता. 13 एप्रिल 2011 ला मोहालीच्या मैदानात धोनीच्या चेन्नईने पंजाबला 189 रनचं आव्हान दिलं. पंजाबकडून या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्याची अपेक्षा कमी जणांनी केली होती. पण वल्थाटीने पहिल्या 10 ओव्हरमध्येच धमाका केला. ऍडम गिलख्रिस्टसोबत इनिंगची सुरुवात करायला आलेल्या वल्थाटीने मैदानात रनचा पाऊस पाडला.

पॉल वल्थाटीने 52 बॉलमध्येच शतक केलं. फक्त 63 बॉलमध्येच वल्थाटीने 120 रनची आतषबाजी केली. या इनिंगमध्ये त्याने 19 फोर आणि 2 सिक्स लगावले. वल्थाटीने अश्विनपासून ते मॉर्कलपर्यंत सगळ्यांनाच चोप दिला. आयपीएलच्या 2011 सालच्या मोसमात वल्थाटीने 14 मॅचमध्ये 463 रन केले होते.

वल्थाटी सध्या कुठे आहे?

आयपीएलच्या पुढच्याच मोसमात वल्थाटीची बॅट चालली नाही. मनगटाच्या दुखापतीमुळे वल्थाटीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचं स्वप्न भंगलं. दुखापतीमुळे तो पुन्हा जुन्या फॉर्ममध्ये कधी परतलाच नाही. वल्थाटी सध्या एयर इंडियाकडून खेळत आहे. एयर इंडियामध्येच तो नोकरी करत आहे. 2018 साली वल्थाटी मुंबई टी-20 लीगमध्ये दिसला होता, पण त्याला जुना करिश्मा दाखवता आला नाही. वल्थाटीकडे असलेल्या गुणवत्तेमुळे तो भारताकडून खेळेल, असं अनेकांना वाटलं होतं, पण त्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

नशीबाने थट्टा मांडली

नशीबानेही वल्थाटीला म्हणावी तशी साथ दिली नाही. 2001 साली मुंबईच्या रणजी टीमच्या संभाव्य खेळाडूंमध्ये वल्थाटीला स्थान मिळालं. पुढच्याच वर्षी अंडर-19 वर्ल्ड कप खेळण्याची संधीही त्याला मिळाली. वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये वल्थाटीच्या डोळ्याला दुखापत झाली. यानंतर तो रणजी मॅच कधीही खेळू शकला नाही. 2012 साली मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे वल्थाटी दुखापतीमुळे आयपीएलला मुकला. वयाच्या 28व्या वर्षीच पॉल वल्थाटी क्रिकेट विश्वातून गायब झाला.

Published by: Shreyas
First published: October 7, 2020, 5:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या