IPL 2020 : विराट कोहलीसोबत मैदानात नेमकं काय झालं? सूर्यकुमार यादवने सांगितलं

IPL 2020 : विराट कोहलीसोबत मैदानात नेमकं काय झालं? सूर्यकुमार यादवने सांगितलं

आयपीएल (IPL 2020) मध्ये मुंबई (Mumbai Indians)ला जिंकवून देण्यात सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) ने मोलाची भूमिका बजावली. बँगलोर (RCB) विरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) ने सूर्यकुमारला दिलेली खुन्नसही चर्चेत राहिली.

  • Share this:

मुंबई : आयपीएल (IPL 2020) मध्ये मुंबई (Mumbai Indians)ला जिंकवून देण्यात सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) ने मोलाची भूमिका बजावली, पण या काळामध्ये सूर्यकुमार यादव चुकीच्या कारणांमुळे चर्चेत राहिला. या मोसमात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सूर्यकुमारचं अनेकांनी कौतूक केलं, पण तरीही त्याची टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही. आयपीएलमध्ये बँगलोर (RCB) विरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहली (Virat Kohli) ने सूर्यकुमारला दिलेली खुन्नसही चर्चेत राहिली. सूर्यकुमार यादवने त्यावेळी विराटसोबत नेमकं काय झालं, याबाबत उत्तर दिलं आहे.

बँगलोरविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहली खेळपट्टीवरच सूर्यकुमारच्या जवळ गेला. विराटने सूर्यकुमारकडे खुन्नस देऊन बघितलं, पण सूर्यकुमारने कोणतीच प्रतिक्रिया न देता त्याच्या बॅटनेच उत्तर देत मुंबईला जिंकवून दिलं. मॅच जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने ड्रेसिंग रूमकडे बघून मी आहे ना, अशी प्रतिक्रिया दिली. विराटसोबत झालेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर विराटवर टीकाही करण्यात आली होती.

मॅच संपल्यानंतर विराट कोहली माझ्याजवळ आला आणि चांगल्या खेळीबद्दल त्याने माझं अभिनंदनही केल्याचं सूर्यकुमार यादव म्हणाला. सूर्यकुमार स्पोर्ट्स तकशी बोलत होता.

'प्रत्येक मॅचमध्ये विराट त्याच उर्जेने मैदानात उतरत असल्याचं मी बघितलं आहे. तो मुंबईविरुद्धच्या मॅचमध्येच आक्रमक होता, असं नाही. तो भारताकडून खेळत असो किंवा फ्रॅन्चायजीकडून त्याची उर्जा आणि आक्रमकपणा तेवढाच असतो. त्यांच्यासाठीही ती मॅच तेवढीच महत्त्वाची होती. मॅच संपल्यानंतर विराट जवळ आला आणि त्याने माझं अभिनंदन केलं,' अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली. टीम इंडियामध्ये निवड झाली नसली, तरी शो मस्ट गो ऑन, असं वक्तव्य सूर्यकुमारने केलं.

'मैदानात काहीही झालं नाही. त्या क्षणाला ती गोष्ट घडली. त्या घटनेला एवढं महत्त्व दिल्याचं पाहून मीदेखील आश्चर्यचकीत झालो,' अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली. बँगलोरविरुद्धच्या त्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने 43 बॉलमध्ये नाबाद 79 रनची खेळी केली आणि मुंबईला विजय मिळवून दिला.

Published by: Shreyas
First published: November 21, 2020, 4:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या