रोहित शर्माच्या दुखापतीवरुन सेहवागचा रवी शास्त्रीवर निशाणा

रोहित शर्माच्या दुखापतीवरुन सेहवागचा रवी शास्त्रीवर निशाणा

IPL 2020 रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या दुखापतीवरुन वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • Share this:

मुंबई, 4 नोव्हेंबर : रोहित शर्माच्या दुखापतीवरुन सुरू असलेला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाही. आयपीएल (IPL 2020)च्या ग्रुप स्टेजची शेवटची मॅच मुंबई (Mumbai Indians)आणि हैदराबाद (SRH)यांच्यात झाली. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उतरला, त्यामुळे आणखी प्रश्न उपस्थित करण्यात आले. मांडीच्या स्नायूला दुखापत झाल्यामुळे रोहित आयपीएलच्या 4 मॅच खेळू शकला नाही. या दुखापतीमुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही निवड झाली नाही. बीसीसीआयचे फिजियो नितीन पटेल यांनी रोहितला अनफिट ठरवलं. पण हैदराबादविरुद्ध टॉससाठी मैदानात उतरल्यावर रोहितने आपण फिट असल्याचं सांगितलं.

रोहित शर्माच्या दुखापतीवरुन वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर निशाणा साधला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्री यांनी रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न करण्याचा निर्णय आपला नव्हता, कारण आपण निवड समितीचे सदस्य नाही, असं म्हणलं. तसंच रोहितच्या मेडिकल रिपोर्टबाबतही मला माहिती नाही, पण दुखापत वाढू शकते, त्यामुळे धोका टाळण्यासाठी रोहितला काही काळ आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचं शास्त्री म्हणाले.

सेहवागने क्रिकबझशी बोलताना रोहितच्या दुखापतीबाबत रवी शास्त्रींना माहिती नाही, असं शक्यच नाही, असं सेहवाग म्हणाला. जरी शास्त्री निवड समितीचा भाग नसले, तरी निवड समिती टीमची निवड करण्याच्या एक दोन दिवस आधी प्रशिक्षकाचं मत जाणून घेते. अधिकृतरित्या नसलं, तरी निवड समिती प्रशिक्षक आणि कर्णधाराला टीमविषयी विचारते, अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली.

रोहित शर्माची भारतीय टीममध्ये निवड व्हायला पाहिजे होती. जर तो त्यावेळी फिट झाला नसता, तर त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूची निवड करता आली असती. एखादा दिग्गज खेळाडू त्याच्या फ्रॅन्चायजीसाठी खेळायला तयार आहे, पण देशासाठी नाही, हे ऐकून हैराण व्हायला होतं. बीसीसीआयचं प्रशासन योग्य नाही, त्यांनी रोहितच्या दुखापतीची पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती, असं वक्तव्य सेहवागने केलं.

Published by: Shreyas
First published: November 4, 2020, 11:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या