IPL 2020 : हा खेळाडू आयपीएलचा चियरलीडर, कामचोर, सेहवागचं टीकास्त्र

IPL 2020 : हा खेळाडू आयपीएलचा चियरलीडर, कामचोर, सेहवागचं टीकास्त्र

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर आता अनेक दिग्गज क्रिकेटपटू मोसमातल्या खेळाडूंच्या कामगिरीची समीक्षा करत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने हटक्या पद्धतीने या मोसमातल्या फ्लॉप खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर आता अनेक दिग्गज क्रिकेटपटू मोसमातल्या खेळाडूंच्या कामगिरीची समीक्षा करत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने हटक्या पद्धतीने या मोसमातल्या फ्लॉप खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केली आहे. यावेळी टीका करताना सेहवाग ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)ला 10 कोटी रुपयांची चियरलीडर म्हणाला.

सेहवागने फेसबूकवर त्याच्या शोमध्ये मॅक्सवेलवर टीका केली. मॅक्सवेलला पंजाब (KXIP)च्या टीमने लिलावात 10 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं. '10 कोटी रुपयांचा चियरलीडर पंजाबला भारी पडला. मागच्या काही वर्षांमधलं मॅक्सवेलचं रेकॉर्ड कामचोरी करण्याचं आहे. या मोसमात त्याने आपलं हे रेकॉर्डही मोडलं,' असं सेहवाग म्हणाला.

मॅक्सवेलने आयपीएलच्या या मोसमात अत्यंत खराब कामगिरी केली. या मोसमातल्या 13 मॅचमध्ये त्याला 15.42 च्या सरासरीने फक्त 108 रनच करता आल्या. संपूर्ण मोसमात मॅक्सवेलला एकही सिक्स मारता आली नाही.

दुसरीकडे सेहवगाने डेल स्टेनचा उल्लेख देशी कट्टा असा केला. 'स्टेन गनला पाहून पहिले जगभरातले खेळाडू घाबरायचे, पण या आयपीएलमध्ये देसी कट्टा आला. स्टेनला मार खाताना बघून डोळ्यावर विश्वासच बसला नाही, पण एक गोष्ट स्पष्ट झाली की या देशी कट्ट्याला आता कोणीही विकत घेणार नाही,' असं सेहवाग म्हणाला.

सेहवागने त्याच्या फ्लॉप खेळाडूंच्या यादीत एरॉन फिंच आणि शेन वॉटसन याचंही नाव घेतलं. तसंच कोलकात्याचा आंद्रे रसेलही अपयशी ठरल्याचं वक्तव्य सेहवागने केलं. या खेळाडूंच्या खराब फॉर्ममुळे त्यांच्या टीमला आयपीएल जिंकता न आल्याचं सेहवागने सांगितलं.

Published by: Shreyas
First published: November 13, 2020, 7:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या