दुबई, 10 ऑक्टोबर : विराट कोहली (Virat Kohli) च्या नाबाद 90 रनच्या खेळीमुळे बैंगलोर (RCB) ने चेन्नई (CSK)ला 170 रनचं आव्हान दिलं आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या बैंगलोरची सुरुवात खराब झाली. एरॉन फिंच या मॅचमध्येही अपयशी ठरला. तर एबी डिव्हिलियर्सही शून्य रन करुन माघारी परतला. विराटने मात्र एकहाती खिंड लढवली. विराटच्या 52 बॉल 90 रनच्या नाबाद खेळीमध्ये 4 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर देवदत्त पड्डीकलने 33 रन केले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरला 2, दीपक चहर आणि सॅम करनला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
या मॅचमध्ये चेन्नईने टीममध्ये एक बदल केला आहे. केदार जाधवच्या ऐवजी धोनी (MS Dhoni)ने जगदीशनला संधी दिली आहे. यंदाच्या मोसमात केदार जाधवच्या बॅटिंगवर बऱ्याच जणांनी टीका केली होती. तसंच त्याला टीममधून बाहेर काढण्याची मागणीही होत होती.
दुसरीकडे बैंगलोरनेही त्यांच्या टीममध्ये बदल केले आहेत. ऑलराऊंडर क्रिस मॉरिस हा पहिल्यांदाच आरसीबीच्या जर्सीत खेळणार आहे, तर गुरुकीरत सिंग मान हा मोहम्मद सीराजच्या जागी टीममध्ये आला आहे. मॉरिस टीममध्ये आल्यामुळे मोईन अलीला बाहेर ठेवण्यात आलं आहे.
चेन्नईची टीम
शेन वॉटसन, फाफ डू प्लेसिस, अंबाती रायडू, एमएस धोनी, एन जगदीसन, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, कर्ण शर्मा
बैंगलोरची टीम
देवदत्त पडिक्कल, ऍरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गुरकीरतसिंग मान, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, इसुरु उदाना, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल
चेन्नईने यंदाच्या मोसमात खेळलेल्या 6 मॅचपैकी फक्त 2 मॅच जिंकल्या आहेत, तर 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. तर बैंगलोरने 5 पैकी 3 सामने जिंकले आणि 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये विराटची टीम पाचव्या क्रमांकावर आहे.