Home /News /sport /

IPL 2020 : 'विराट' विक्रम! हा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

IPL 2020 : 'विराट' विक्रम! हा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

आयपीएल (IPL 2020)च्या दिल्ली (Delhi Capitals)विरुद्धच्या सामन्यात बैंगलोर (Royal Challengers Bangalore)चा पराभव झाला. पण या सामन्यात बैंगलोरचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)ने विक्रम केला.

    दुबई, 6 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या दिल्ली (Delhi Capitals)विरुद्धच्या सामन्यात बैंगलोर (Royal Challengers Bangalore)चा पराभव झाला. पण या सामन्यात बैंगलोरचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)ने विक्रम केला आहे. या सामन्यात विराटने 10 रन पूर्ण करताच त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 9 हजार रनचा टप्पा ओलांडला. ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय बॅट्समन ठरला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 4 विकेट गमावत 196 रन केल्या. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीला 9 विकेट गमावत 137 रनच करता आल्या. या विजयाबरोबरच गुण तालिकेत दिल्लीने पहिल्यास्थानी झेप घेतली आहे. आयपीएलच्या सुरुवातीला काही सामन्यांमध्ये अडखळत खेळणाऱ्या विराट कोहलीने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 72 धावांची खेळी केली, आणि आरसीबीला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात देखील कोहलीने सर्वाधिक 43 रन करत संघर्ष केला. पण आपल्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी त्या अपुऱ्या पडल्या. आयपीएलमध्ये विराटच्याच सर्वाधिक रन आयपीएलमध्ये कोहलीने आतापर्यंत 182 सामन्यांत 37.72 च्या सरासरीने 5545 रन केल्या आहेत. आयपीएलमध्ये देखील सर्वाधिक रन करणारा विराट कोहली एकमेव बॅट्समन आहे. त्याने हा विक्रम 271 इनिंगमध्ये केला आहे. यामध्ये त्याने 5 शतकं आणि 65 अर्धशतकंदेखील झळकावली आहेत. विराटने टी-20 क्रिकेटमधली सगळी 5 शतकं आयपीएलमध्येच केली आहेत. तर आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 37 अर्धशतकं आहेत. आयपीएलमध्ये कोहलीने 193 सिक्स आणि 489 फोर लगावले आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या