Home /News /sport /

IPL 2020 : जुन्या विराटचं पुन्हा दर्शन, राजस्थानला हरवत आरसीबी अव्वल स्थानी

IPL 2020 : जुन्या विराटचं पुन्हा दर्शन, राजस्थानला हरवत आरसीबी अव्वल स्थानी

आयपीएल (IPL 2020) मध्ये जुन्या विराट कोहली (Virat Kohli)चं पुन्हा एकदा दर्शन झालं आहे.

    अबु धाबी, 3 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये जुन्या विराट कोहली (Virat Kohli)चं पुन्हा एकदा दर्शन झालं आहे. राजस्थान (Rajasthan Royals)विरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीने 53 बॉलमध्ये नाबाद 72 रनची खेळी केली. विराटच्या या खेळीमुळे बैंगलोर (Royal Challengers Bangalore)चा 8 विकेटने विजय झाला. विराट कोहलीचं यंदाच्या आयपीएलमधलं हे पहिलंच अर्धशतक आहे. हैदराबादविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये विराट 14 रन करून आऊट झाला, तर पंजाब आणि मुंबईविरुद्ध त्याला 1 आणि 3 रन करता आल्या. आजच्या मॅचआधी यंदाच्या स्पर्धेत विराटला एकही फोर मारता आली नव्हती. राजस्थानने ठेवलेल्या 154 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचा ओपनर एरॉन फिंच 8 रन करून आऊट झाला. यानंतर देवदत्त पडीकल आणि विराट कोहलीने 99 रनची पार्टनरशीप करत विजय निश्चित केला. देवदत्त पडीकलने 45 बॉलमध्ये 63 रन केले. तर एबी डिव्हिलियर्स 12 रनवर नाबाद राहिला. राजस्थानच्या जोफ्रा आर्चरला आणि श्रेयस गोपाळला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. या मॅचमध्ये राजस्थानने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण बैंगलोरच्या बॉलरनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. बैंगलोरच्या युझवेंद्र चहलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर इसरू उडानाला 2 विकेट मिळाल्या. नवदीप सैनीला 1 विकेट घेण्यात यश आलं. राजस्थानकडून महिपाल लोमरोरने सर्वाधिक 47 रन केले. तर राहुल टेवटियाने 12 बॉलमध्ये नाबाद 24 रन आणि जोफ्रा आर्चरने 10 बॉलमध्ये नाबाद 16 रन करुन राजस्थानला 150 रनपर्यंत पोहोचवलं. या विजयासोबतच विराटची टीम पॉईंट्स टेबलमध्येही अव्वल स्थानी पोहोचली आहे. बैंगलोरच्या टीमने आतापर्यंत 4 पैकी 3 मॅचमध्ये विजय मिळवला, तर 1 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. तर दुसरीकडे राजस्थानची टीम सहाव्या क्रमांकावर गेली आहे. राजस्थानने 4 पैकी 2 मॅच गमावल्या, तर 2 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या