मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : धोनी-अंपायर वादानंतर विराट म्हणतो 'तो' नियमच बदला

IPL 2020 : धोनी-अंपायर वादानंतर विराट म्हणतो 'तो' नियमच बदला

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमातही अंपायरच्या निर्णयांमुळे वाद होत आहेत. चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या मॅचवेळी अंपायरने वाईड बॉलचा इशारा करत असतानाच अचानक हात मागे घेतले. अंपायर वाईडचा निर्णय देत असतानाच धोनी (MS Dhoni) ने उघड नाराजी व्यक्त केली. विराट कोहली (Virat Kohli) ने यावर तोडगा सांगितला आहे.

पुढे वाचा ...
    दुबई, 15 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमातही अंपायरच्या निर्णयांमुळे वाद होत आहेत. चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या मॅचवेळी अंपायरने वाईड बॉलचा इशारा करत असतानाच अचानक हात मागे घेतले. अंपायर वाईडचा निर्णय देत असतानाच धोनी (MS Dhoni) ने उघड नाराजी व्यक्त केली. पण अनेकांनी धोनीने अंपायरवर दबाव टाकल्याचा आरोप केला. डगआऊटमध्ये बसलेल्या हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानेही अंपायरने बदललेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. चेन्नईच्या बॉलिंगवेळी 19व्या ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूरने टाकलेला बॉल ऑप स्टम्पच्या वाईडच्या रेषेजवळ होता. अंपायर पॉल रायफल यांनी सुरुवातीला वाईड बॉलचा इशारा देण्यासाठी हात पुढे गेला, पण धोनीनं उघड नाराजी व्यक्त करताच पॉल रायफल यांनी हात मागे घेतले आणि वाईडचा निर्णय फिरवला. धोनी-अंपायरच्या या वादामध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने उपाय सुचवला आहे. डीआरएसप्रमाणेच कर्णधाराला वाईड बॉल आणि कंबरेच्यावरचा नो बॉल रिव्ह्यू करण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी विराटने केली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पायाचा नो बॉल देण्यापासून मैदानातल्या अंपायरला मुक्त करण्यात आलं आहे. नो बॉलचा निर्णय आता थर्ड अंपायर घेतो. मागच्या वर्षी नो बॉलमुळे झालेल्या चुकांनंतर हा निर्णय घेण्यात आला. आता विराट कोहलीने वाईड बॉल आणि कंबरेच्या नो बॉलसाठीही रिव्ह्यू मिळावा, अशी मागणी केली आहे. सध्या प्रत्येक टीमला इनिंगसाठी 1 रिव्ह्यू घेता येतो. डीआरएस एलबीडब्ल्यू आणि कॅचसाठी खेळाडू बहुतेकवेळा डीआरएसचा वापर करतात. पंजाबचा कर्णधार केएल राहुल याच्याशी बोलताना कोहलीने वाईड बॉलसाठीचा रिव्ह्यू असावा, असं सांगितलं. 'आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये या छोट्या गोष्टी मोठा परिणाम करतात. जर तुम्ही एका रनने पराभूत होत असाल, तर तो चुकीचा निर्णय तुम्ही रिव्ह्यू करू शकत नाही, त्यामुळे कर्णधार म्हणून वाईड बॉल आणि कंबरेच्या नो बॉललाही रिव्ह्यू मिळावा, अशी माझी इच्छा आहे,' असं विराट म्हणाला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या