Home /News /sport /

IPL 2020 : अंपायरनी वॉर्नरला मदत केली? डीआरएसवरुन आयपीएलमध्ये नवा वाद

IPL 2020 : अंपायरनी वॉर्नरला मदत केली? डीआरएसवरुन आयपीएलमध्ये नवा वाद

IPL 2020 मंगळवारी दिल्ली (Delhi Capitals) आणि हैदराबाद (SRH)यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात अंपायर अनिल चौधरी (Anil Chaudhari)यांनी डीआरएसवेळी स्वत:चे मत व्यक्त केल्याचा आक्षेप घेतला जात आहे.

    दुबई, 29 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये अंपायरचे वाद काही नवे नाहीत. चुकीच्या निर्णयांमुळे खेळाडू आणि अंपायर यांच्यामधले बरेच वाद प्रेक्षकांनी बघितले आहेत. यावेळी मात्र अंपायरनी खेळाडूला मदत केल्याचा आरोप होत असल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मंगळवारी दिल्ली (Delhi Capitals) आणि हैदराबाद (SRH)यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात अंपायर अनिल चौधरी (Anil Chaudhari)यांनी डीआरएसवेळी स्वत:चे मत व्यक्त केल्याचा आक्षेप घेतला जात आहे. दिल्लीची बॅटिंग सुरु असताना 17व्या ओव्हरमध्ये संदीप शर्माने टाकलेला बॉल अश्विनच्या पॅडवर लागला. त्यावेळी हैदराबादने एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं. अंपायर अनिल चौधरींनी हे अपील फेटाळीन लावलं, त्यामुळे हैदराबाद डीआरएस घेण्याच्या तयारीत होतं, पण अनिल चौधरी यांनी बॅटला बॉल लागल्याचा इशारा केला, यानंतर वॉर्नरने डीआरएस घेतला नाही. आयसीसीच्या नियमांनुसार अंपायरनी कोणत्याही टीमला डीआरएसवेळी खाणाखुणा करुन कसल्याच प्रकारचे संकेत द्यायचे नसतात, पण तरीही अनिल चौधरी यांनी हा नियम मोडल्याचं बोललं जात आहे, आणि म्हणूनच हा वाद निर्माण झाला आहे. डेव्हिड वॉर्नरने हा डीआरएस न घेतल्याचा मॅचवर फारसा परिणाम झाला नाही, कारण हैदराबाद विजयाच्या मार्गावर होतं. हैदराबादने या मॅचमध्ये 2 विकेट गमावून 219 रन केल्या होत्या. या मॅचमध्ये त्यांचा तब्बल 88 रननी विजय झाला. आयपीएलच्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडूला डीआरएसचा निर्णय घेण्याआधी अंपायर किंवा ड्रेसिंग रुममधल्या कोणत्याही व्यक्तीशी चर्चा करता येत नाही. तसंच अंपायरचं मतही विचारात घेता येत नाही, असं आयपीएल नियम 3.2.3 मध्ये लिहिलेलं आहे. खेळाडू जर अंपायर किंवा ड्रेसिंग रुममधल्या कोणाची तरी डीआरएस घेण्यासाठी मदत घेत असेल, तर टीमचा तो डीआरएस फेटाळून लावण्याचा अधिकार मैदानातल्या अंपायरला आहे. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात स्कॉट स्टायरिस आणि संजय बांगर यांनी अंपायरने केलेल्या या इशाऱ्यावर आक्षेप घेतला. अंपायरने हे करणं योग्य आहे का? असे स्टायरिसने विचारलं. आम्ही खेळायचो तेव्हा अंपायरना विचारायचो, पण तेव्हा डीआरएस नव्हता, त्यामुळे अंपायरचा निर्णयच कायम राहायचा, असं स्टायरिस म्हणाला. संजय बांगर यांनीही स्टायरिसच्या मताशी सहमती दर्शवली. जेव्हा डीआरएस घेण्यासाठी तुमच्याकडे 15 सेकंद असतात, तेव्हा अंपायरने असे संकेत देण्याच्या गोष्टीशी मीदेखील सहमत नाही, असं बांगर म्हणाले.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या