Home /News /sport /

IPL 2020 : पहिल्या आयपीएलमध्ये बॉल बॉय, आता दिल्लीकडून खेळतोय हा मुंबईकर

IPL 2020 : पहिल्या आयपीएलमध्ये बॉल बॉय, आता दिल्लीकडून खेळतोय हा मुंबईकर

तुषार देशपांडे लोकल ट्रेनने शिवाजी पार्क जिमखान्यात आला. मुंबईतल्या ट्रेनच्या गर्दीमध्ये तुषार आधीच दमला होता. जिमखान्यात पोहोचल्यानंतर तुषारला तिकडे बॅट्समनची मोठी रांग दिसली, मग तो बॉलरच्या रांगेत जाऊन उभा राहिला. इकडूनच त्याचा बॉलर बनण्याचा प्रवास सुरू झाला.

तुषार देशपांडे लोकल ट्रेनने शिवाजी पार्क जिमखान्यात आला. मुंबईतल्या ट्रेनच्या गर्दीमध्ये तुषार आधीच दमला होता. जिमखान्यात पोहोचल्यानंतर तुषारला तिकडे बॅट्समनची मोठी रांग दिसली, मग तो बॉलरच्या रांगेत जाऊन उभा राहिला. इकडूनच त्याचा बॉलर बनण्याचा प्रवास सुरू झाला.

IPL 2020 राजस्थान (Rajasthan Royals)विरुद्धच्या मॅचमध्ये दिल्ली (Delhi Capitals) चा 13 रनने विजय झाला. दिल्लीच्या या विजयात मुंबईकर तुषार देशपांडे (Tushar Deshpande) ने मोलाचा वाटा उचलला.

    दुबई, 14 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात दिल्ली (Delhi Capitals)ची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. राजस्थान (Rajasthan Royals)विरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीचा 13 रनने विजय झाला. दिल्लीच्या या विजयात मुंबईकर तुषार देशपांडेने मोलाचा वाटा उचलला. तुषारने 4 ओव्हरमध्ये 37 रन देऊन 2 विकेट घेतल्या. बेन स्टोक्स आणि श्रेयस गोपाळ यांना तुषारने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. याचसोबत तुषारने या मॅचची शेवटची ओव्हरही टाकली. राजस्थानला शेवटच्या ओव्हरला 22 रनची गरज असताना तुषारने फक्त 8 रन देऊन दिल्लीला विजय मिळवून दिला. दिल्लीने या मॅचमध्ये हर्षल पटेलच्याऐवजी तुषार देशपांडे (Tushar Deshpande)ला संधी दिली होती. तुषारची आयपीएलची ही पहिलीच मॅच होती. दिल्लीने 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर तुषारला लिलावात खरेदी केलं होतं. सहा महिन्यानंतर तुषारने पहिल्यांदाच बॉलिंग केली. आपल्या बॉलिंगने बॅट्समनना त्रास देणाऱ्या तुषारला स्वत:लाच सुरुवातीला बॅट्समन व्हायचं होतं, पण बॅट्समनची मोठी रांग बघून त्याने बॉलर व्हायचं ठरवलं. आयपीएलच्या पहिल्या मोसमात देशपांडे मुंबईत बॉल बॉय होता. त्यावेळी तुषार अंडर-13 खेळत होता. क्रिकइन्फोच्या बातमीनुसार कल्याणमध्ये राहणारा तुषार देशपांडे लोकल ट्रेनने शिवाजी पार्क जिमखान्यात आला. मुंबईतल्या ट्रेनच्या गर्दीमध्ये तुषार आधीच दमला होता. जिमखान्यात पोहोचल्यानंतर तुषारला तिकडे बॅट्समनची मोठी रांग दिसली, मग तो बॉलरच्या रांगेत जाऊन उभा राहिला. इकडूनच त्याचा बॉलर बनण्याचा प्रवास सुरू झाला. देशपांडेची क्रिकेट कारकिर्द 25 वर्षांचा तुषार देशपांडे मध्यमगती बॉलर आहे. मुंबईकडून त्याने अंडर-16 आणि अंडर-19 क्रिकेट खेळलं आहे. सोबतच तो इंडिया-ए आणि इंडिया ब्लू कडूनही खेळला आहे. कूच बिहार ट्रॉफीमधल्या चमकदार कामगिरीमुळे तुषार चर्चेत आला. त्याचवर्षी 2016-17 साली तुषारला रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. 2018-19च्या विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये तुषार देशपांडेने 23 रन देऊन 5 विकेट घेतल्या. तुषारने 20 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 50 आणि 20 टी-20 मॅचमध्ये 31 विकेट घेतल्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या