मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : मुंबईच्या खेळाडूला नव्हती खेळायची आयपीएल, आता ठरतोय मॅच विनर

IPL 2020 : मुंबईच्या खेळाडूला नव्हती खेळायची आयपीएल, आता ठरतोय मॅच विनर

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians)ने जबरदस्त कामगिरी केली आहे. 10 पैकी 7 मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) हा मुंबईचा सगळ्या मोठा मॅच विनर ठरला आहे.

  • Published by:  Shreyas

शारजाह, 23 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians)ने जबरदस्त कामगिरी केली आहे. 10 पैकी 7 मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्येही मुंबईची टीम पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईने जिंकलेल्या बहुतेक मॅच या बॉलरनी जिंकवून दिल्या आहेत. चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्येही मुंबईच्या बॉलरनी भन्नाट कामगिरी केली. मुंबईच्या भेदक बॉलिंगमुळे पावरप्ले मध्येच चेन्नईच्या 5 विकेट गेल्या होत्या. धोनी, डुप्लेसिस, रायुडू यांच्यासारखे दिग्गज बॅट्समन असताना चेन्नईने त्यांच्या 7 विकेट 43 रनवरच गमावल्या होत्या.

चेन्नईला या मॅचमध्ये सगळ्यात जास्त नुकसान ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) ने पोहोचवलं. बोल्टने आपल्या पहिल्या 3 ओव्हरमध्येच चेन्नईला एका पाठोपाठ एक धक्के दिले. बोल्टने त्याच्या 4 ओव्हरमध्ये 18 रन देऊन 4 विकेट घेतल्या.

बोल्टने दिला 440 व्होल्टचा झटका

ट्रेन्ट बोल्टने पहिल्याच ओव्हरमध्ये चेन्नईला बॅकफूटवर नेलं. पाचव्याच बॉलला बोल्टने ऋतुराज गायकवाडला शून्य रनवर एलबीडब्ल्यू केलं. दुसऱ्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर बोल्टने पुन्हा चेन्नईला झटका दिला. बोल्टने आऊटस्विंग बॉल टाकून डुप्लेसिसला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर बोल्टने रविंद्र जडेजाची विकेट घेऊन चेन्नईची कंबरच तोडून टाकली.

आयपीएलच्या या मोसमात बोल्टने शानदार बॉलिंग केली आहे. बोल्टने पावरप्लेमध्ये 24 ओव्हर टाकून 10 विकेट घेतल्या आहेत. बोल्टची आयपीएल पावरप्लेमधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 2015 पासून 2019 पर्यंत बोल्टने पावरप्लेमध्ये 9 विकेट घेतल्या होत्या. आता एकाच वर्षात 10 मॅचमध्ये बोल्टने स्वत:चंच रेकॉर्ड मोडलं आहे.

आयपीएलच्या या मोसमात खेळण्यासाठी बोल्ट तयार नव्हता. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती. यानंतर बीसीसीआयने युएईमध्ये आयपीएल खेळवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा कुटुंबाच्या सुरक्षेच्या कारणास्तव आपण आयपीएल खेळण्याबाबत नंतर निर्णय घेऊ, असं बोल्ट म्हणाला होता. पण विचार केल्यानंतर त्याने खेळण्याचा निर्णय घेतला आणि आता तो मुंबईचा सगळ्यात मोठा मॅच विनर ठरत आहे.

First published: