Home /News /sport /

IPL 2020 : ट्रेन्ट बोल्टचा विक्रम, आयपीएल इतिहासात हा रेकॉर्ड करणारा पहिला खेळाडू

IPL 2020 : ट्रेन्ट बोल्टचा विक्रम, आयपीएल इतिहासात हा रेकॉर्ड करणारा पहिला खेळाडू

आयपीएल (IPL 2020) फायनलमध्ये ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult)ने पुन्हा एकदा पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतली.

    दुबई, 10 नोव्हेंबर : आयपीएलमध्ये आपणचं राजे असल्याचं मुंबई (Mumbai Indians)ने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. फायनलमध्ये दिल्ली (Delhi Capitals)चा पराभव करत मुंबईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. रोहित शर्मा आणि ट्रेन्ट बोल्ट हे मुंबईच्या विजयाचे हिरो ठरले. दिल्लीने ठेवलेल्या 157 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितने 51 बॉलमध्ये 68 रन करत मुंबईचा विजय सोपा केला. पण त्याआधी दिल्लीला 156 रनवर रोखण्यात बोल्टने मोलाची भूमिका बजावली. बोल्टने 4 ओव्हरमध्ये 30 रन देऊन 3 विकेट घेतल्या. आयपीएल (IPL 2020) फायनलमध्ये ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult)ने पुन्हा एकदा पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतली. याआधीच्या मोसमात बोल्ट दिल्लीकडून खेळला होता, पण त्यांनी या मोसमाआधी बोल्टला मुंबईला ट्रान्सफर केलं आणि तोच बोल्ट दिल्लीसाठीच धोकादायक ठरला. बोल्टने फायनलच्या पहिल्याच बॉलला मार्कस स्टॉयनिसला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. बोल्टने टाकलेला बाऊन्सर स्टॉयनिसला कळला नाही आणि विकेटकीपर क्विंटन डिकॉकने त्याचा कॅच पकडला. स्टॉयनिसची विकेट घेताच बोल्टने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. बोल्टने या आयपीएलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 8 विकेट घेतल्या आहेत. आतापर्यंतच्या आयपीएलमधलं हे रेकॉर्ड आहे. स्टॉयनिसची विकेट घेतल्यानंतर बोल्टने पुढच्याच ओव्हरमध्ये अजिंक्य रहाणेलाही माघारी धाडलं. याचसोबत त्याने या मोसमात पावरप्लेमध्ये 16 विकेट घेण्याचा रेकॉर्डशीबरोबरी केली. याआधी 2013 साली मिचेल जॉनसनने मुंबईसाठीच 16 विकेट घेतल्या होत्या. ट्रेन्ट बोल्टने या मोसमात मुंबईसाठी 15 मॅचमध्ये 7.97 ची इकोनॉमी आणि 18.38 च्या सरासरीने 25 विकेट घेतल्या. यंदाच्या मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या मोसमात बोल्टपेक्षा रबाडाने 30 आणि बुमराहने 27 विकेट घेतल्या. दिल्लीची खराब कामगिरी या मोसमात दिल्लीने पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक विकेट गमावण्याचा नकोसा रेकॉर्डही केला. दिल्लीने या मोसमात पहिल्या ओव्हरमध्ये 9 विकेट गमावल्या, त्यांचे 9 ओपनर 9 वेळा शून्य रनवर आऊट झाले. फायनलमध्येही याचीच पुनरावृत्ती झाली.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या