मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : चेन्नईच्या या 5 खेळाडूंसाठी यंदाची आयपीएल ठरणार शेवटची?

IPL 2020 : चेन्नईच्या या 5 खेळाडूंसाठी यंदाची आयपीएल ठरणार शेवटची?

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)ची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. अनेक खेळाडूंना एक-एक रन काढण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. यामुळे चेन्नईची टीम प्ले-ऑफच्या शर्यतीतून जवळ जवळ बाहेर झाली आहे.

  • Published by:  Shreyas

दुबई, 23 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)ची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. अनेक खेळाडूंना एक-एक रन काढण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. यामुळे चेन्नईची टीम प्ले-ऑफच्या शर्यतीतून जवळ जवळ बाहेर झाली आहे. पॉईंट्स टेबलमध्येही चेन्नईची टीम शेवटच्या क्रमांकावर आहे. चेन्नईचा त्यांच्या पुढच्या मॅच जिंकता आल्या, तरी ते 14 पॉईंट्स पर्यंत पोहोचू शकतात, त्यामुळे त्यांना प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.

आयपीएलच्या या मोसमात एमएस धोनी (MS Dhoni)च्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. युवा खेळाडूंना संधी न देता वारंवार फॉर्ममध्ये नसणाऱ्या खेळाडूंना खेळवलं जात आहे. या टीममधल्या बहुतेक खेळाडूंचं वय 35 च्या पुढे आहे, त्यामुळे अनेक खेळाडूंसाठी यंदाची आयपीएल शेवटची ठरू शकते.

इम्रान ताहिर

मागच्या मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या इम्रान ताहिरला यंदाच्या मोसमात एकही मॅचमध्ये संधी मिळाली नाही. 2019 साली ताहिरने 26 विकेट घेत पर्पल कॅप पटकवली होती. इम्रान ताहिर हा या टीममधला सगळ्यात वयस्कर खेळाडू आहे. ताहिरचं वय 42 वर्ष आहे.

हरभजन सिंग

आयपीएल इतिहासातल्या सगळ्यात यशस्वी बॉलरपैकी एक असलेल्या हरभजनचं वयही 40 झालं आहे. वैयक्तिक कारणासाठी यंदाच्या आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय हरभजनने घेतला होता. चेन्नईसोबतचा त्यांचा 3 वर्षांचा करार संपत आहे, त्यामुळे हरभजन पुन्हा चेन्नईकडून खेळण्याची शक्यता कमी आहे.

शेन वॉटसन

राजस्थान आणि चेन्नईकडून दोन वेळा आयपीएल जिंकवून देणाऱ्या वॉटसनने 2018-19 साली वय जास्त महत्त्वाचं नसतं हे दाखवून दिलं. पण यंदाच्या मोसमात 10 मॅचमध्ये त्याला फक्त 285 रन करता आले आहेत. तसंच तो आता बॉलिंगही करत नाही. वॉटसनचं सध्याच वय 39 आहे, त्यामुळे तोही आयपीएलमध्ये परत दिसेल का? याबाबत साशंकता आहे.

केदार जाधव

केदार जाधव या मोसमात अत्यंत खराब फॉर्ममध्ये आहे. 8 मॅचच्या 5 इनिंगमध्ये त्याने 62 रन केले आहेत. यात त्याचा स्ट्राईर रेटन 93.93 आहे आणि सर्वाधिक स्कोअर 26 रन आहे. केदारचं वय 36 वर्ष आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी चेन्नई त्याचा करार संपवू शकतं.

ड्वॅन ब्राव्हो

वेस्ट इंडिजच्या दिग्गज ऑलराऊंडर ड्वॅन ब्राव्होने चेन्नईला असंख्य मॅच जिंकवल्या आहेत. 37 वर्षांचा ड्वॅन ब्राव्हो दुखापतींमुळे त्रस्त आहे. मांडीच्या दुखापतीमुळे ब्राव्होला स्पर्धा सोडून घरी जावं लागलं आहे. सततच्या दुखापतीमुळे पुढच्या मोसमात कदाचित ब्राव्हो दिसणार नाही.

First published: