IPL 2020 : संजू सॅमसन आऊट का नॉट आऊट? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे पुन्हा वाद

IPL 2020 : संजू सॅमसन आऊट का नॉट आऊट? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे पुन्हा वाद

  • Share this:

अबु धाबी, 4 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) आणि अंपायरचे वादग्रस्त निर्णय यांचं नातं तसं जुनंच आहे. यंदाचं वर्षही त्याला अपवाद नाही. राजस्थान (Rajasthan Royals)आणि बैंगलोर (Royal Challengers Bangalore)यांच्यात झालेल्या मॅचमध्येही अंपायरने दिलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या सामन्यात मैदानतल्या अंपायरने नाही, तर थर्ड अंपायरनेच टेक्नोलॉजी उपलब्ध असताना चूक केल्यामुळे टीका होत आहे. बैंगलोर आणि राजस्थानच्या या मॅचमध्ये संजू सॅमसनला वादग्रस्त पद्धतीने आऊट देण्यात आलं.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात धमाकेदार फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसनला बैंगलोरविरुद्धच्या मॅचमध्ये 4 रन करुनच पॅव्हेलियनमध्ये जावं लागलं. सॅमसनला युझवेंद्र चहलने आपल्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं. चहलने टाकलेल्या बॉलवर सॅमसनने ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला, पण चहलने उडी मारून बॉल पकडला. यानंतर चहल आणि बैंगलोरचे खेळाडू जल्लोष करायला लागले. पण अंपायरना संशय आल्यामुळे त्यांनी थर्ड अंपायरकडे धाव घेतली.

कॅमेरामध्ये बघितल्यानंतर चहलने पकडलेला बॉल जमिनीला टेकल्याचं दिसत होतं. सॅमसन नॉटआऊट असतानाही त्याला थर्ड अंपायरने आऊट दिलं. बॉल जमिनीला लागल्याचं स्पष्ट कळत नसल्याचं थर्ड अंपायरने सांगितलं, त्यामुळे मैदानातल्या अंपायरने सॉफ्ट डिसिजन आऊट दिल्यामुळे थर्ड अंपायरनेही सॅमसनला आऊट दिलं. पण यानंतर व्हायचा तो वाद झालाच.

सॅमसनविरुद्ध चहलचं चांगलं रेकॉर्ड

सॅमसनला वादग्रस्त पद्धतीने आऊट देण्यात आलं असलं, तरी त्याचं चहलविरुद्धचं रेकॉर्ड फारसं चांगलं नाही. चहलने सॅमसनला 23 बॉलमध्ये 4 वेळा आऊट केलं. सॅमसनने चहलविरुद्ध फक्त 79च्या स्ट्राईक रेटने 23 रन केले.

Published by: Shreyas
First published: October 4, 2020, 7:37 AM IST
Tags:

ताज्या बातम्या