Home /News /sport /

IPL 2020 : फॉर्ममध्ये असलेल्या दिल्लीला तिसरा धक्का, दिग्गज खेळाडूला दुखापत

IPL 2020 : फॉर्ममध्ये असलेल्या दिल्लीला तिसरा धक्का, दिग्गज खेळाडूला दुखापत

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात दिल्ली (Delhi Capitals)ची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मात्र आता त्यांना दुखापतीने ग्रासलं आहे.

    दुबई, 14 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात दिल्ली (Delhi Capitals)ची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दिल्लीच्या टीमने यावर्षी 7 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवला आहे, तर 2 मॅचमध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावर्षी जबरदस्त खेळ करणाऱ्या दिल्लीला मात्र आता तिसरा धक्का बसला आहे. टीमचा दिग्गज खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) ला दुखापत झाली आहे. ऋषभ पंतच्या मांसपेशींमध्ये ग्रेड-1 ची दुखापत झाली आहे, त्यामुळे तो कमीत कमी 10 दिवस खेळू शकणार नाही. दिल्लीचे खेळाडू अमित मिश्रा आणि इशांत शर्मा यांनाही दुखापत झाली, त्यामुळे त्यांना संपूर्ण मोसमाला मुकावं लागणार आहे. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्येही ऋषभ पंत दुखापतीमुळे खेळला नव्हता. त्यामुळे ऍलेक्स कॅरीला दिल्लीने संधी दिली होती. तर शिमरन हेटमायरला बाहेर ठेवण्यात आलं होतं. पंत आणि हेटमायर हे दोन्ही आक्रमक बॅट्समन टीममध्ये नसल्यामुळे दिल्लीला शेवटच्या काही ओव्हरमध्ये आक्रमक बॅटिंग करता आली नव्हती. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीच्या टीमने ऋषभ पंतचा स्कॅन रिपोर्ट बीसीसीआयच्या मेडिकल टीमला पाठवला आहे. कारण बीसीसीआयशी करार असणाऱ्या खेळाडूचा रिपोर्ट बीसीसीआयच्या मेडिकल टीमला पाठवणं बंधनकारक आहे. यावरुनच पंतला ग्रेड-1 ची दुखापत झाल्याचं निष्पन्न झालं आहे. ललित यादवला संधी? ऋषभ पंतच्या गैरहजेरीत दिल्लीच्या टीमचं संतुलन बिघडल्याचं दिसत आहे. त्यामुळे ललित यादव या ऑलराऊंडरला टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. ललित यादवने सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेत त्याने 30 मॅचमध्ये 136 च्या स्ट्राईक रेटने रन केले आहेत. दिल्लीने त्याला 20 लाख रुपयांच्या किंमतीत विकत घेतलं होतं. ललित यादव मधल्या फळीतल्या बॅट्समनसोबतच ऑफ स्पिनरही आहे. ललित यादवने 2 वेळा 6 बॉलमध्ये 6 सिक्स लगावले आहेत. अंडर-14 क्रिकेटमध्ये 40 ओव्हरच्या मॅचमध्ये द्विशतक केल्यानंतर ललित यादव चर्चेत आला होता. ललित यादवने 12 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 40.71 च्या सरासरीने 570 रन केले आहेत, यात 6 अर्धशतकांचा समावेश आहे. तर लिस्ट ए मॅचमध्ये त्याने 35.12 च्या सरासरीने 281 रन केले आहेत. ललित यादवने 30 टी-20 मॅचमध्ये 29.14च्या सरासरीने 408 रन केले. तसंच त्याने 12 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 9 विकेट, लिस्ट एच्या 17 मॅचमध्ये 18 विकेट आणि 30 टी-20 मॅचमध्ये 20 विकेट घेतल्या. त्याचा इकोनॉमी रेटही 6.92 आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऍलेक्स कॅरी यालाच विकेट कीपिंगची संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. कॅरीला 30 टी-20 मॅचमध्ये फक्त 6 सिक्स मारता आल्या आहेत. कॅरीला दिल्लीने 40 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं होतं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या