IPL 2020 : 1 जागा आणि 5 दावेदार, प्ले-ऑफची चुरस वाढली

IPL 2020 : 1 जागा आणि 5 दावेदार, प्ले-ऑफची चुरस वाढली

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या हंगामातल्या 39 मॅच झाल्या आहेत, पण अजूनही प्ले-ऑफला पोहोचण्यासाठी टीममध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR)विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB)च्या विजयामुळे प्ले-ऑफची चुरस आणखी वाढली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या हंगामातल्या 39 मॅच झाल्या आहेत, पण अजूनही प्ले-ऑफला पोहोचण्यासाठी टीममध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR)विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB)च्या विजयामुळे प्ले-ऑफची चुरस आणखी वाढली आहे. बँगलोरच्या विजयामुळे पंजाब, राजस्थान आणि हैदराबादच्या टीमच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. एवढच नाही तर धोनीच्या चेन्नईलाही आशेचा किरण दिसू लागला असेल.

या 3 टीम प्ले-ऑफसाठी जवळपास निश्चित

दिल्ली, बँगलोर आणि मुंबई या तीन टीमचं प्ले-ऑफला पोहोचणं जवळपास निश्चित दिसत आहे. दिल्ली आणि बँगलोरच्या खात्यात प्रत्येकी 14-14 पॉईंट्स आहेत, तर मुंबई 12 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईने आतापर्यंत 9 मॅच खेळल्यामुळे त्यांच्या 5 मॅच अजून बाकी आहेत. त्यामुळे या तिन्ही टीम कमीत कमी दोन-तीन मॅच जिंकून प्ले-ऑफ सहज गाठू शकतात.

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकात्याच्या या मोसमातल्या अजून 4 मॅच बाकी आहेत. त्यांच्या खात्यात सध्या 10 पॉईंट्स आहेत. पण बँगलोरविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे त्यांचा नेट रनरेटही तेवढाच खराब झाला आहे. त्यामुळे प्ले-ऑफला पोहोचण्यासाठी कोलकात्याला कमीत कमी 3 मॅच तरी जिंकाव्या लागणार आहेत.

पंजाब

लागोपाठ 5 मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर पंजाबने या स्पर्धेत जोरदार पुनरागमन केलं. केएल राहुलच्या टीमने मागच्या तिन्ही मॅचमध्ये विजय मिळवला. पंजाबच्या खात्यात सध्या 8 पॉईंट्स आहेत, तर त्यांच्या आणखी 4 मॅच बाकी आहेत. या चारही मॅच जिंकून पंजाब प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकते.

राजस्थान आणि हैदराबाद

10 मॅचमध्ये 8 पॉईंट्ससह राजस्थान सहाव्या आणि 9 मॅचमध्ये 6 पॉईंट्ससह हैदराबाद सातव्या क्रमांकावर आहे. प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी या दोन्ही टीमनाही त्यांच्या उरलेल्या मॅचमध्ये विजय मिळावावा लागणार आहे.

चेन्नईलाही अपेक्षा

धोनीच्या टीमला आता एखादा चमत्कारच प्ले-ऑफमध्ये पोहोचवू शकतो. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम शेवटच्या क्रमांकावर आहे. चेन्नईने 10 पैकी 3 मॅच जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात 6 पॉईंट्स आहेत. चेन्नईने आता उरलेल्या सगळ्या मॅच जिंकल्या आणि दुसऱ्या टीम लागोपाठ काही मॅच हरल्या, तर चेन्नई प्ले-ऑफमध्ये दिसू शकते.

आयपीएलच्या इतिहासावर नजर टाकली, तर 16 पॉईंट्ससह टीम प्ले-ऑफमध्ये सहज प्रवेश करतात, तर 14 पॉईंट्स असलेल्या टीमचा नेट रनरेट प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. मागचं वर्ष मात्र आयपीएलसाठी अपवादात्मक होतं. हैदराबादने 12 पॉईंट्समध्ये प्ले-ऑफला प्रवेश मिळवला होता.

Published by: Shreyas
First published: October 22, 2020, 4:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या