Home /News /sport /

IPL 2020 : ट्रेण्ड बदलला, आयपीएल टीमची ही रणनीती ठरत आहे अपयशी

IPL 2020 : ट्रेण्ड बदलला, आयपीएल टीमची ही रणनीती ठरत आहे अपयशी

आयपीएलच्या तेराव्या हंगामात RCB नं जबरदस्त कामगिरी केली आहे. गुणतालिकेत 12 गुणांसह RCBचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे गेल्या हंगामात तळाला असणारा हा संघ यावेळी प्ले ऑफ गाठणार हे निश्चित आहे. शनिवारी राजस्थान विरुद्ध झालेला सामना RCBनं 7 विकेटनं जिंकला.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात RCB नं जबरदस्त कामगिरी केली आहे. गुणतालिकेत 12 गुणांसह RCBचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे गेल्या हंगामात तळाला असणारा हा संघ यावेळी प्ले ऑफ गाठणार हे निश्चित आहे. शनिवारी राजस्थान विरुद्ध झालेला सामना RCBनं 7 विकेटनं जिंकला.

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमातल्या 19 मॅच झाल्या आहेत. यातल्या बऱ्याच मॅचचा निकाल हा शेवटच्या बॉलवर लागला, तर काही मॅचमध्ये सुपर ओव्हरही झाल्या. पण यंदाच्या मोसमात टीम आणि कर्णधार त्यांच्या जुन्याच रणनीतीमध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे.

पुढे वाचा ...
    दुबई, 6 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमातल्या 19 मॅच झाल्या आहेत. यातल्या बऱ्याच मॅचचा निकाल हा शेवटच्या बॉलवर लागला, तर काही मॅचमध्ये सुपर ओव्हरही झाल्या. पण यंदाच्या मोसमात टीम आणि कर्णधार त्यांच्या जुन्याच रणनीतीमध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे. बहुतेक टीम या टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करायचा निर्णय घेत आहेत. पण आयपीएलची यंदाची आकडेवारी बघितली, तर मात्र हा ट्रेण्ड बदलल्याचं दिसत आहे. याच कारणामुळे टॉस जिंकूनही अनेक टीमना पराभवाचा सामना करावा लागत आहे. या चुका करण्यात नवख्या केएल राहुलपासून ते अनुभवी एमएस धोनी आणि विराट कोहलीचाही समावेश आहे. आयपीएलमध्ये मागच्या वर्षापर्यंत टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेणं, हा विजयाचा मंत्र मानला जात होता. टॉस जिंकून फिल्डिंग घ्यायची आणि मिळालेल्या आव्हानाचा पाठलाग करायचा, ही रणनीती घेऊन टीम मैदानात उतरायच्या. मागच्या 3 वर्षांमध्ये तर या रणनीतीला यशही मिळत होतं. यावर्षी मात्र एकदम उलट निकाल लागले आहेत. सोमवारी झालेल्या मॅचमध्येही बैंगलोर (Royal Challengers Bangalore)टॉस जिंकून पहिले फिल्डिंग केली आणि त्यांचा पराभव झाला. दिल्ली (Delhi Capitals)ने हा सामना 59 ने खिशात टाकला. 2020 मध्ये 63 टक्के मॅच पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम जिंकल्या युएईमध्ये होत असलेल्या यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या 19 मॅचपैकी 12 मॅचमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे, तर दुसऱ्यांदा बॅटिंग करत असताना 5 विजय झाले आहेत. स्पर्धेतल्या 2 मॅच या टाय झाल्या. या आकडेवारीनुसार 63.15 टक्के मॅच या पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकल्या, तर 26.31 टक्के मॅच दुसऱ्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमला जिंकता आल्या. 2019 मध्ये 58 टक्के मॅच पाठलाग करताना विजयी आयपीएलचा मागचा मोसम भारतात खेळवला गेला होता. त्यावेळी खेळवण्यात आलेल्या 60 मॅचपैकी 35 मॅच दुसऱ्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकल्या. म्हणजेच आव्हानाचा पाठलाग करताना टीमना जास्त विजय मिळाले. तर पहिले बॅटिंग करताना फक्त 22 विजयाची नोंद झाली. 60 पैकी 2 मॅच टाय झाल्या होत्या, ज्याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये आला, तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली होती. आयपीएल 2019 मध्ये दुसऱ्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमनी 58.33 टक्के तर पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमनी 36.66 टक्के सामने जिंकले. 2018 मध्ये 53 टक्के विजय 2018 सालच्या मोसमात 60 पैकी 32 मॅच दुसऱ्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमने तर 26 मॅच पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकल्या. या आकडेवारीनुसार 53.33 टक्के मॅच दुसऱ्यांदा बॅटिंग करताना आणि 46.66 टक्के मॅच पहिले बॅटिंग करताना जिंकता आल्या. 2017 सालीही हीच परिस्थिती 2018 च्या मोसमासारखीच 2017 सालचीही परिस्थिती होती. त्यावर्षी 60 पैकी 32 मॅच दुसऱ्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमने आणि 26 मॅच पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकल्या. त्या मोसमात एक मॅच पावसामुळे रद्द झाली आणि एक मॅच टाय झाली. म्हणजेच टीमनी 53.33 टक्के मॅच दुसऱ्यांदा बॅटिंग करताना आणि पहिले बॅटिंग करताना 43.33 टक्के मॅच जिंकल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या