Home /News /sport /

IPL 2020 : मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्यकुमारची बोलकी प्रतिक्रिया

IPL 2020 : मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्यकुमारची बोलकी प्रतिक्रिया

आयपीएल (IPL 2020) च्या बुधवारी बँगलोर (RCB)विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)च्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)ने नाबाद अर्धशतकी खेळी केली.

    अबु धाबी, 29 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या बुधवारी बँगलोर (RCB)विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)च्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)ने नाबाद अर्धशतकी खेळी केली. सूर्यकुमारच्या या खेळीमुळे मुंबईने बँगलोरवर सहज विजय मिळवला. या विजयानंतर सूर्यकुमार यादवने केलेलं सेलिब्रेशन ही बोलकी प्रतिक्रिया असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादवची निवड होईल, हे निश्चित मानलं जात होतं, पण तरीही त्याला संधी देण्यात आली नाही. या मॅचमध्ये समोर भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीच असताना त्याने मॅच विनिंग खेळी केली आणि पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलं. मुंबईच्या विजयानंतर त्याने 'मी आहे ना' असा इशारा ड्रेसिंग रुमच्या दिशेने केला. सूर्यकुमार यादव या मॅचमध्ये स्वत:ची बाजू मांडत होता. तो सर्वांना म्हणत होता, की माझ्याकडे पाहा मी खेळू शकतो, असंच तो सूचवत होता, असं मत कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी व्यक्त केलं. बँगलोरविरुद्धच्या या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने 43 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने नाबाद 79 रन केले. त्याआधी मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर मुंबईच्या बॉलरनी बँगलोरला 164 रनवर रोखलं. विजयी चौकार मारल्यानंतर सूर्यकुमारने ड्रेसिंग रूमच्या दिशेने इशारा केला. I'm here, why fear? मी येथे असताना घाबरायचे कारण नाही, असंच तो सांगतोय असं वाटलं. यादवच्या या शांत आणि अनोख्या प्रतिक्रियेमुळे बरेचजण प्रभावित झाले. तर अनेकांना असेही वाटलं की कुठेतरी ही खेळी त्याला टीम इंडियाची जर्सी न मिळाल्याची निराशा दर्शवत होती. तसेच यादवला ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या भारतीय टीमच्या विमानाचं तिकीट मिळावं, अशी अनेकांची इच्छा होती. यादवच्या खेळाचे आणि त्यावर त्याने दिलेल्या प्रतिक्रियेचे सगळीकडेच कौतुक होत आहे. त्याच्या या खेळातून त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवले असेही लोकांचे म्हणणे आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यानेही सुर्याची टीम इंडियामध्ये निवड न झाल्याबाबत नाराजी व्यक्त केली. स्कॉट स्टायरिस आणि टॉम मुडी यांनीही ट्विटरवरून सूर्यकुमारच्या खेळीचं कौतुक केलं. सूर्यकुमारने या आयपीएलमध्ये 12 सामन्यांत 155 च्या स्ट्राइक रेटने 362 रन केल्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या