Home /News /sport /

IPL 2020 : सूर्या चमकला ! मुंबईचं राजस्थानला 194 रनचं आव्हान

IPL 2020 : सूर्या चमकला ! मुंबईचं राजस्थानला 194 रनचं आव्हान

    अबु धाबी, 6 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या राजस्थान (Rajasthan Royals)विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकामुळे मुंबई (Mumbai Indians)ने 20 ओव्हरमध्ये 193 रनपर्यंत मजल मारली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या मुंबईला ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि क्विंटन डिकॉक (Quinton Dekock)ने चांगली सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये 4.5 ओव्हरमध्येच 49 रनची पार्टनरशीप झाली. यानंतर क्विंटन डिकॉक 23 रनवर आणि रोहित 35 रनवर आऊट झाला. बैंगलोरविरुद्ध चमकदार कामगिरी करणारा इशान किशन पहिल्याच बॉलवर पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्यकुमार यादवने 47 बॉलमध्ये 79 रनची नाबाद खेळी केली. हार्दिक पांड्याही 29 रनवर नाबाद राहिला. या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)ने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. पंजाब आणि हैदराबादविरुद्ध झालेल्या विजयानंतर मुंबई आता राजस्थानविरुद्ध विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी मैदानात उतरली आहे. तर दुसरीकडे राजस्थानने त्यांचे मागचे दोन्ही सामने गमावले आहेत. मागच्या काही वर्षातलं मुंबईचं राजस्थानविरुद्धचं रेकॉर्डही फारसं चांगलं नाही. 2015 सालापासून मुंबईला राजस्थानविरुद्ध एकही सामना जिंकता आला नाही. आजच्या मॅचमध्ये विजय मिळवला तर मुंबईला पॉईंट्स टेबलमध्ये पुन्हा पहिल्या क्रमांकावर जाता येईल. लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा मुंबईची टीम रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कायरन पोलार्ड, राहुल चहर, जेम्स पॅटिनसन, जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट राजस्थानची टीम जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल, स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, महिपाल लोमरोर, राहुल तेवतिया, टॉम करन, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, अंकित राजपूत, कार्तिक त्यागी
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या