IPL 2020 : सूर्यकुमार यादवचा विक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिलाच खेळाडू

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians) ची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)च्या जबरदस्त फॉर्ममुळे मुंबई प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारी पहिली टीम ठरली.

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians) ची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)च्या जबरदस्त फॉर्ममुळे मुंबई प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारी पहिली टीम ठरली.

  • Share this:
    शारजाह, 3 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians) ची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)च्या जबरदस्त फॉर्ममुळे मुंबई प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारी पहिली टीम ठरली, सोबतच पॉईंट्स टेबलमध्येही मुंबई यावर्षी पहिल्या क्रमांकावर कायम राहणार आहे. हैदराबाद (SRH)विरुद्धच्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलच्या लागोपाठ 3 मोसमात 400 पेक्षा जास्त रन करणारा सूर्यकुमार यादव पहिलाच अनकॅप खेळाडू ठरला आहे. एकही आंतरराष्ट्रीय मॅच न खेळणाऱ्या खेळाडूचा उल्लेख अनकॅप खेळाडू म्हणून केला जातो. अनकॅप खेळाडूंमध्ये कोणत्याही खेळाडूला एकूण दोन मोसमातही 400 रनचा टप्पा ओलांडता आला नाही. 2018 साली सूर्यकुमार यादवने 512 रन, 2019 साली 424 रन आणि 2020 सालीही 400 रनचा टप्पा ओलांडला आहे. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये सूर्यकुमार 29 बॉलमध्ये 36 रन करुन माघारी परतला. या मोसमात सूर्याने 14 मॅचमध्ये 41 ची सरासरी आणि 150.18 च्या स्ट्राईक रेटने 410 रन केले आहेत. यावर्षी सूर्याने 3 अर्धशतकं केली असून 79 नाबाद हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. 2019 साली सूर्यकुमार यादवने 16 मॅचमध्ये 32.61 ची सरासरी आणि 130.86 च्या स्ट्राईक रेटने 424 रन केले होते, यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश होता, तर 2018 साली सूर्याने 14 मॅचमध्ये तब्बल 512 रन केले होते. त्यावर्षी सूर्या 36.57 ची सरासरी आणि 133.33 च्या स्ट्राईक रेटने खेळला होता. 2018 साली सूर्याला 4 अर्धशतकं करता आली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या भारतीय टीममध्ये सूर्यकुमार यादवची निवड होईल, असं निश्चित मानलं जात होतं, पण निवड समितीने त्याला संधी न दिल्यामुळे वाद निर्माण झाला होता. अनेकांनी सूर्याला संधी न दिल्याच्या निवड समितीच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. हरभजन सिंग याने याचवरुन निवड समितीवर टीका केली होती. तर दिलीप वेंगसरकर यांनी सूर्याला वगळण्याच्या निवड समितीच्या हेतूची चौकशी व्हावी, अशी मागणी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्याकडे केली होती. सोशल मीडियावरही सूर्यकुमारला टीममध्ये न घेण्याचे पडसाद उमटले होते, अनेकांनी याच मुद्द्यावरुन विराट कोहलीवर टीका केली होती.
    Published by:Shreyas
    First published: